1. यशोगाथा

कोण म्हणतं शेती तोट्याची? अहमदनगर मधील शेतकऱ्यांनी ढेमसे लागवड करून चार महिन्यात केली 60 लाखांची उलाढाल

शेती क्षेत्रात (Farming) काळाच्या ओघात बदल, पीकपद्धतीत बदल तसेच कष्टाला नियोजनाची सांगड घातली तर निश्चितच चांगले यशस्वी उत्पादन घेतले जाऊ शकते. देशातील अनेक शेतकरी पुत्र (Farmer) शेती क्षेत्रात मिळत असलेल्या तुटपुंजी उत्पन्नामुळे शेतीपासून दुरावत चालले आहेत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
आधुनिकतेची कास धरून अवघ्या चार महिन्यात 60 लाखांची उलाढाल

आधुनिकतेची कास धरून अवघ्या चार महिन्यात 60 लाखांची उलाढाल

शेती क्षेत्रात (Farming) काळाच्या ओघात बदल, पीकपद्धतीत बदल तसेच कष्टाला नियोजनाची सांगड घातली तर निश्चितच चांगले यशस्वी उत्पादन घेतले जाऊ शकते. देशातील अनेक शेतकरी पुत्र (Farmer) शेती क्षेत्रात मिळत असलेल्या तुटपुंजी उत्पन्नामुळे शेतीपासून दुरावत चालले आहेत.

मात्र नगरमधील (Ahmednagar) शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीचे (Group Farming) महत्त्व अधोरेखित करत आधुनिकतेची कास धरून अवघ्या चार महिन्यात 60 लाखांची उलाढाल करून शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.

Important News : सुरवातीला 15 लाखांचे नुकसान; मात्र, आज कमवतोय वर्षाला 40 लाख

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याच्या 25 शेतकऱ्यांनी गट शेती करायला सुरुवात केली. गट शेती अर्थात सामूहिक शेती करून या शेतकऱ्यांनी ढेमसे या पिकाची लागवड केली. सध्या सामूहिक पद्धतीने उत्पादित केलेल्या ढेमसे पिकाची विक्री सुरू आहे आणि या 25 शेतकऱ्यांना यातून सुमारे 60 लाखांची उलाढाल होण्याची आशा आहे.

Important News : कांद्याने केला वांदा! कपाशी उपटून लावला कांदा अन आता म्हणतोय कांदा नको रे बाबा

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की ढेमसे या पिकाची लागवड वर्षभरात कधीही केली जाऊ शकते. असे असले तरी या वेलवर्गीय पिकाची श्रीगोंदा तालुक्यात लागवड फारशी बघायला मिळत नाही. या अनुषंगाने श्रीगोंदा तालुक्यातील कृषी मार्गदर्शक राहुल पोळ यांनी 20 ते 25 शेतकऱ्यांचा ग्रुप तयार केला.

या ग्रुपच्या माध्यमातून राहुल पोळ यांनी कमी पाण्यात उत्पादित केले जाऊ शकणारे ढेमसे या वेलवर्गीय पिकाची लागवड केली. विशेष म्हणजे हे पीक उत्पादित करण्यासाठी त्यांनी आधुनिकतेची कास धरली आणि पाण्याच्या व्यवस्थापनासाठी तसेच विद्राव्य खत देण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन प्रणालीचा यशस्वी वापर केला.

हेही वाचा : Papaya Farming : शेतकरी मित्रांनो पपई लागवड करण्यास पोषक वातावरण; मात्र या टिप्स वापरा आणि कमवा बक्कळ पैसा

जवळपास वीस शेतकऱ्यांनी ढेमसे या वेलवर्गीय भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. यापासून शेतकऱ्यांना जवळपास पंधरा ते वीस मेट्रिक टन एकरी ढेमसे उत्पादित होण्याची आशा आहे. सध्या ढेमसे या पिकाला 25 ते 100 रुपये प्रति किलो या दराने भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना एकरी दीड ते दोन लाखांची कमाई होण्याची आशा आहे. निश्चितच शेतकऱ्यांनी केलेला हा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे.

हेही वाचा : Onion Rate : विश्वास कोणावर ठेवायचा! नाफेड कडूनच कांदा खरेदी करताना शेतकऱ्याची फसवणूक

English Summary: Who says agriculture is losing? Farmers in Ahmednagar have made a turnover of Rs 60 lakh in four months Published on: 25 April 2022, 12:38 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters