1. बातम्या

Onion: डाळिंबरत्न बी.टी गोरेंचा राडा!! एकरात 25 टन कांद्याचे उत्पादन

गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत सापडत आहे. कांदा उत्पादक करणारे शेतकरी देखील निसर्गाच्या लहरीपणामुळे वारंवार संकटात सापडत आले आहेत यामुळे शेतकऱ्यांना लाख रुपयांचा फटका देखील सहन करावा लागतो. मात्र नगरच्या एका अवलिया शेतकऱ्याने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. नगरच्या एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने (Onion Growers) निसर्गाच्या लहरीपणाचा (Climate Change) सामना करत केवळ एका एकरात 25 टन कांद्याचे यशस्वी उत्पादन (Onion Production) घेतले आहे

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
डाळिंबरत्न बी. टी. गोरे

डाळिंबरत्न बी. टी. गोरे

गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत सापडत आहे. कांदा उत्पादक करणारे शेतकरी देखील निसर्गाच्या लहरीपणामुळे वारंवार संकटात सापडत आले आहेत यामुळे शेतकऱ्यांना लाख रुपयांचा फटका देखील सहन करावा लागतो. मात्र नगरच्या एका अवलिया शेतकऱ्याने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. नगरच्या एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने (Onion Growers) निसर्गाच्या लहरीपणाचा (Climate Change) सामना करत केवळ एका एकरात 25 टन कांद्याचे यशस्वी उत्पादन (Onion Production) घेतले आहे

यामुळे पंचक्रोशीत नव्हे-नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात हा शेतकरी मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. एका एकरात 25 टन कांद्याचे यशस्वी उत्पादन घेण्याची किमया बाबासाहेब गोरे अर्थात बी. टी. गोरे (B. T. Gore) या कांदा उत्पादक शेतकऱ्याने साधली आहे. बाबासाहेबांच्या या कामगिरीची दखल राहुरी कृषी विद्यापीठाने (Rahuri Agricultural University) देखील घेतली असून बाबासाहेबांनी उत्पादित केलेल्या पद्धतीने कांदा उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्यांना आता प्रोत्साहित केले जाणार आहे. यासाठी प्रचार आणि प्रसार जोरावर सुरू केला जाईल असे समजत आहे.

बाबासाहेब गोरे नगर जिल्ह्यातील राहता तालुक्याच्या मौजे राजुरी येथील रहिवासी शेतकरी आहेत. मित्रांनो बाबासाहेबांनी कांदा या नगदी पिकाच्या लागवडीसाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब केला आणि म्हणूनच उत्पादनात दुपटीने वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की सर्वसाधारण एका एकरातून कांदा उत्पादक शेतकरी 11 ते 15 टन कांद्याचे उत्पादन घेत असतो. मात्र कांद्याच्या शेतीत योग्य पद्धतीने नियोजन केले आणि नियोजनाचा आधुनिकतेची जोड दिली तर कांद्याच्या उत्पादनात दुपटीने वाढ करता येणे शक्य असते हे बाबासाहेबांनी दाखवून दिले आहे. बीटी गोरे यांनी कांदा लागवड करण्याआधी अगदी पूर्व मशागतीपासून स्वतः जातीने लक्ष घातले आणि पाण्याचे सूक्ष्म नियोजन करीत एकरी 25 टन कांद्याचे उत्पादन घेतले. बी टी गोरे यांच्या कांदा काढणीच्या वेळी राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू पी जी पाटील देखील उपस्थित होते. बीटी गोरे यांचे हे तंत्रज्ञान महाराष्ट्रातील तळागळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले जाईल असे कुलगुरू महोदय यांनी यावेळी स्पष्ट केले.

मित्रांनो खरे पाहता बीटी गोरे अर्थात बाबासाहेब गोरे महाराष्ट्रासाठी काही अनोळख नाव नाही. विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रात या माणसाचा मोठा जलवा आहे. या माणसाला प्रामुख्याने डाळिंबाच्या शेतीसाठी महाराष्ट्रात विशेष ओळखले जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील कानाकोपऱ्यात यशस्वी डाळिंब शेतीसाठी हा माणूस प्रख्यात आहे. यामुळे बाबासाहेब गोरे यांना डाळिंब रत्न ही उपाधी देखील देण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रासमवेतच संपूर्ण देशातील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकरी बांधवांना यातून बाहेर काढण्यासाठी पिकांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करावी लागणार आहे. यासाठी डाळिंब रत्न बीटी गोरे यांच्या प्रयोगासारखा प्रयोग राबविणे आता गरजेचे ठरू लागले आहे.

English Summary: Onion BT Gore's good work Production of 25 tons of onion per acre Published on: 19 April 2022, 07:23 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters