1. बातम्या

Onion Rate : विश्वास कोणावर ठेवायचा! नाफेड कडूनच कांदा खरेदी करताना शेतकऱ्याची फसवणूक

नुकत्याच काही दिवसांपूर्वी नाफेड कडून राज्यात कांदा खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. नाफेड कांदा खरेदी करण्यासाठी रणांगणात उतरला बरोबरच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले होते. मात्र आता नाफेड कडूनच शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नाफेड ही एक केंद्र सरकारचे संस्था आहे ज्याद्वारे देशातून शेतमालाची खरेदी केली जाते. सरकार या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उचित मोबदला देण्यासाठी प्रयत्न करत असते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
onion farmers

onion farmers

नुकत्याच काही दिवसांपूर्वी नाफेड कडून राज्यात कांदा खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. नाफेड कांदा खरेदी करण्यासाठी रणांगणात उतरला बरोबरच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले होते. मात्र आता नाफेड कडूनच शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नाफेड ही एक केंद्र सरकारचे संस्था आहे ज्याद्वारे देशातून शेतमालाची खरेदी केली जाते. सरकार या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उचित मोबदला देण्यासाठी प्रयत्न करत असते.

मात्र आता शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करताना नाफेड कडूनच दुटप्पी व्यवहार होत असल्याचा धक्कादायक आरोप होत आहे. मित्रांनो शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करताना नाफेडणे एकाच भावात कांदा खरेदी करणे अपेक्षित आहे.

मात्र नाफेड राज्यातील वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये वेगवेगळ्या दराने कांदा खरेदी करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडत असल्याचे आता उघड झाले आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की नाशिकमध्ये नाफेड कडून बाराशे रुपये प्रति क्‍विंटल दराने कांदा खरेदी केला जात आहे मात्र अहमदनगरमध्ये याचं नाफेड कडून हजार रुपये प्रति क्विंटल या दराने कांदा खरेदी होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने नाफेडच्या कांदा खरेदी वर प्रश्नचिन्ह उभा केला आहे.

महत्वाची बातमी:-Crop Damage : बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्याला लाखोंचा फटका; केव्हा उबजारी येईल बळीराजा

खरं पाहता कांदा एक नगदी पीक मात्र कांद्याचे दर एका रात्रीत बदलतात यामुळे कांदा पिकाला बेभरवशाचे पीक म्हणून संबोधले जाते. कांद्याच्या दरातील लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो.

यामुळे कांदा उत्पादक संघटना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला हमीभाव देण्याची मागणी करताना बघायला मिळत आहे. परंतु मायबाप सरकार याकडे लक्ष घालण्यास तयार नाही. मित्रांनो सध्या नाफेडकडून हजार ते बाराशे रुपये प्रति क्विंटल या दराने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला जातं आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाची बातमी:-Successful Farmer : फक्त पाच एकरात घेतले सुमारे 125 टन खरबूजचे उत्पादन

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, आता दरात मामुली वाढ करून नाफेड मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करेल आणि भविष्यात कांद्याचे दर वाढल्यास हेच नाफेड साठवलेला कांदा बाजारात विक्रीसाठी आणेल.

यामुळे आता नाफेडचे उद्दिष्टांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्यांना आता नाफेड शेतकऱ्यांच्या हिताचे आहे की, नुकसानीचा असा प्रश्न पडला आहे. नाफेड कडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांदा दरात जवळपास दोनशे रुपये प्रतिक्विंटल अशी तफावत असल्याने एवढी मोठी तफावत का आहे असा प्रश्न आता कांदा उत्पादक संघटना उपस्थित करीत आहे.

महत्वाची बातमी:-मोठी बातमी : उसाची एक रकमी एफआरपी मिळावी म्हणून राजू शेट्टी छेडणार आंदोलन

English Summary: Onion Rate: Who to trust! Fraud of farmers while buying onions from NAFED Published on: 24 April 2022, 10:28 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters