सध्या दूध उत्पादन हे अनेक शेतकरी करत आहेत. शेतीमध्ये भावात कमी जास्त प्रमाणात दर होत असताना सध्या दूध उत्पादन करताना शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. यामुळे शेतकरी याकडे वळाले आहेत.
अनेक गावांत त्यांनी आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आता सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी गावानेही मुरघास निर्मितीत आघाडी घेत आपली वेगळी ओळख तयार केली आहे.
गावाची लोकसंख्या 1600 आहे. चारही बाजूंना डोंगर आहे. पर्जन्यमान कमी असल्यामुळे दहा ते अकरा महिने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उन्हाळ्यात निर्माण होतो.
कुटुंबाचा उदरनिर्वाह मजबूत व्हावा यासाठी पूरक म्हणून एक, दोन गायींचे संगोपन करून चिलेवडीचे ग्रामस्थ दुग्ध व्यवसायही करत आहेत. गावात लोकसहभागातून ७०० ते ८०० जणांनी सलग ५० दिवस श्रमदान केले.
यातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे होऊ लागली. सर्वांच्या कष्टाला अखेर फळ येऊन चांगल्या कामाचे प्रतीक म्हणून या स्पर्धेत कोरेगाव तालुक्यात गावाने प्रथम क्रमांक पटकावला. पुढील खरिपात चांगला पाऊस झाला.
यानंतर याचे परिणाम सर्वांना दिसू लागले. तसेच भारत फोर्ज, पुणे या कंपनीने गाव दत्तक घेतले. त्यातून सार्वजनिक कामे मोठ्या प्रमाणात होऊ लागली. तसेच लॉकडाउनच्या काळात शहरात वास्तव्यास असलेले गावातील अनेक तरुण घरी परतले.
हा आहे जगातील सर्वात महागडा तांदूळ, एका किलोच्या किमतीत येईल महिन्याचा बाजार..
त्यांना दुग्ध व्यवसाय फायदेशीर वाटून ते त्याकडे वळले. अनेकांनी गाई घेऊन शहराला रामराम केला. अशा रीतीने गायींची संख्या व दूध उत्पादनातही वाढ झाली. यामुळे आज येथील तरुण लाखोंमध्ये खेळत आहेत.
आता मुरघास चारा दर्जेदार व वर्षभर वापरता येत असल्याने २०२० पासून अनेक शेतकरी त्याकडे वळले. सध्या गावातील प्रत्येक दुग्धोत्पादक शेतकरी बॅग किंवा बंकर वा खड्डा पद्धतीने मुरघास निर्मिती करताना दिसत आहे. यामुळे गावात समृद्धी आली आहे.
आता मातीशिवाय पिकणार बटाटे, जाणून घ्या, सोप्पी पद्धत
दूध उत्पादनात 15-20 टक्के घट, पशुपालक चिंतेत..
बैलगाडा शर्यतींचे आयोजन करताना सरकारकडून नवीन नियमावली जाहीर, वाचा नियम, ५ लाखांचा दंड...
Share your comments