1. पशुधन

जाणून घेऊ स्वच्छ दूध उत्पादनासाठी घ्यावयाची खबरदारी

शेती व्यवसाय मध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्त्वाचा व्यवसाय आहे. दूध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरित गाई, गावठी दुधाळ गाई आणि दुधाळ म्हशी पाळल्या जातात. जुन्या पद्धतीने दूध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्र आणि व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चिजतपणे शाश्वत धंदा असून आर्थिक दृष्ट्या चांगला परवडतो.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
clean milk production

clean milk production

 शेती व्यवसाय मध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्त्वाचा व्यवसाय आहे. दूध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरित गाई, गावठी दुधाळ गाई आणि दुधाळ म्हशी पाळल्या जातात. जुन्या पद्धतीने दूध  व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्र आणि व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्‍चितपणे शाश्वत धंदा असून आर्थिक दृष्ट्या चांगला परवडतो.

 जर आपल्या आहाराचा विचार केला तर प्रत्येकाला प्रतिदिनी 300 मिली दुधाची गरज भासते. आपल्याकडे गाई पासून पंचेचाळीस टक्के तर म्हशी कडून 52 टक्के दूध मिळते. दुधामध्ये पाणी, कर्बोदके, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्वे व भरपूर प्रमाणात कॅलरीज असल्याने दूध हे पूर्णान्न आहे. या पूर्णांन्न असलेल्या दुधाची  काळजी घेतली तर स्वच्छ दूध मिळते. त्यासाठी काय करावे, कोणते उपाय योजावेत याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

 स्वच्छ दूध उत्पादनासाठी कोणती काळजी घ्यावी?

  • यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जनावरांचा गोठा आणि दूध काढण्याची जागा शक्यतो वेगवेगळे असावे. दूध काढण्यासाठी स्वच्छ मोकळी जागा वापरली तरी चालण्यासारखे आहे. ज्या ठिकाणी आपण दूध काढतो त्या ठिकाणचा परिसर व आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा.
  • दुभते जनावर वेगळे करून त्याच्या कमरेचा भाग, शक्ती व मागील मांड्या यावरून पाणी मारून खरारा करावा व कास आणि सड खरबरीत स्वच्छ फडक्याने पुसून स्वच्छ करावे यामुळे रक्ताभिसरण वाढून जनावर ताजीतवाने आणि तरतरीत  होते.
  • जनावराला बांधल्यानंतर कोमट पाण्यात अगदी कमी प्रमाणात पोटॅशियम परमॅग्नेट चे खडे टाकून तयार केलेल्या सौम्य द्रावणाने त्याची कास व सड धुवावे व लगेच स्वच्छ फडक्याने पुसावे.
  • दरम्यान दूध काढण्यासाठी स्वच्छ व निर्जंतुक केलेली भांडी, एक छोटा कप दूध गाळण्याचे स्वच्छ मलमल पांढरे कापड जागेवर आणून ठेवावे.
  • कोमट पाण्याने कास  धुतल्यानंतर गाय किंवा म्हैस पान्हा सोडण्यास सुरुवात करते.
  • दूध काढणाऱ्या व्यक्तीने आपले हात पोटॅशियम परमॅग्नेट च्या द्रावणात धुऊन स्वच्छ करावेत व दूध काढण्यास सुरुवात करावी.
  • सर्वप्रथम प्रत्येक सडातील पहिल्या काही धारा वेगवेगळ्या स्वतंत्र कपात काढावेत व स्तनदाह याची चाचणी करावी.
  • दूध काढण्याची क्रिया सुमारे सात ते आठ मिनिटांत पूर्ण करावी व दूध मुठ पद्धतीने काढावे.
  • दूध काढण्यासाठी डोन शेप म्हणजेच विशिष्ट आकार  असणारी भांडे वापरावीत.

 

  • दूध काढणी संपल्यानंतर दुधाचे भांडे वेगळ्या खोलीत न्यावे.
  • दूध काढताना जनावरास शक्यतो वाळलेली वैरण, घास इत्यादी प्रकारचे खाद्य घालू नये फक्त आंबवून द्यावे.
  • दुध स्वच्छ व कोरड्या शक्यतो स्टीलच्या भांड्यात मलमलच्या पांढरा फडक्यातून गाळून साठवावे.
  • शक्य असेल तर काढलेल्या दुधाचे भांडे बर्फाच्या पाण्यात लगेच बुडून ठेवावे. हे शक्य नसेल तरी आपल्या जगभरातील माठातील किंवा रांजण तील गार पाणी वापरावे. थोड्या थोड्या वेळाने पाणी बदलावे.
  • गाळून थंड पाण्यात साठवलेल्या दूधाचा लवकरात लवकर वापर किंवा विक्री करावी.

अशा पद्धतीने दूध उत्पादन केल्या दुधाची प्रत व गुणवत्तेत सुधारणा होऊन त्याची साठवण क्षमता निश्चित वाढते.

English Summary: take precaution in clean milk production Published on: 25 July 2021, 02:15 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters