शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल घडवून आणणे अति महत्त्वाचे ठरते. जो शेतकरी शेतीमध्ये बदल करतो तो निश्चितच यशस्वी ठरतो. शेतीमध्ये बदल करून कशा पद्धतीने लाखोंचे उत्पादन कमवले जाऊ शकते हेच दाखवून दिले आहे लातूर जिल्ह्यातील एका उच्चविद्याविभूषित अवलिया शेतकऱ्याने.
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्याच्या मौजे लिंबाळवाडी येथील रहिवासी शेतकरी नागनाथ भगवंत पाटील यांनी शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करत समाजापुढे एक नवीन आदर्श ठेवला आहे.
महत्वाच्या बातम्या
Maharashtra Rain : राज्यात पावसाचे लवकरच आगमन!! बहावा बहरल्याने पाऊस लवकर येण्याची शक्यता वाढली
MBA मासावाला!! प्रतिष्ठित कंपनीतील नोकरी सोडून सुरू केली मत्स्यशेती; आता महिन्याकाठी कमवतोय 11 लाख
Goat Farming : बकरी पालन करतात का? मग या अँप्लिकेशनचा वापर करा आणि व्हा यशस्वी
या उच्चविद्याविभूषित अवलिया शेतकऱ्याने पीकपद्धतीत बदल करत जिरेनियम शेती करण्याचा निर्णय घेतला आणि यामध्ये त्यांनी मोठं यश देखील मिळवले आहे. एम ए बी एड पर्यंत शिक्षण घेतलेल्या या अवलिया शेतकऱ्याने नोकरी मागे न धावता शेतीमध्ये काहीतरी हटके करण्याचा विचार केला. या अनुषंगाने त्यांनी मोठी शोधाशोध केली आणि जिरेनियम शेतीचा मार्ग स्वीकारला. या अनुषंगाने त्यांनी आपल्या वडिलोपार्जित अकरा एकर शेतजमीनीत जिरेनियमची लागवड केली आहे.
जिरेनियम व्यतिरिक्त या शेतकऱ्याने फळबाग लागवडीत देखील आपला हात आजमावला आहे. नागनाथ पपई आंबा या फळबाग पिकांची शेती करतात याशिवाय ते भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करतात तसेच हळद या पिकाची देखील ते शेती करीत आहेत. नागनाथ यांनी फक्त जिरेनियम ची शेती केली असे नाही तर जिरेनियम या औषधी वनस्पती पासून तेल निर्मितीचा देखील त्यांनी उद्योग उभारला.
या उद्योगात ते आपल्या अकरा एकर शेत जमिनीत उत्पादित झालेल्या जिरेनियम या औषधी वनस्पती पासून तेल उत्पादित करतात तसेच इतर शेतकऱ्यांच्या 30 एकर वरील शेतजमिनीत उत्पादित झालेल्या जिरेनियम पासून देखील ते तेल उत्पादित करीत आहेत. एका लिटर तेल पासून त्यांना 11 हजार 500 रुपये उत्पादन मिळत आहे. दिवसाला चार लिटर जिरेनियमचे तेल नागनाथ उत्पादित करीत आहेत म्हणजेच दिवसाला 48 हजारांची कमाई करतात.
दिवसाकाठी जवळपास 17 मजुरांना त्यांनी हाताला काम देखील दिले आहे. नागनाथ पाटील व त्यांच्या भावाकडे जवळपास 32 एकर शेतजमीन आहे. या शेतजमिनीत काम करण्यासाठी त्यांनी जवळपास 25 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. निश्चितच नागनाथ यांनी शेतीमध्ये केलेले हे कार्य कौतुकास्पद आहे. नागनाथ यांनी शेती क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल महाराष्ट्र कृषी विभागाने देखील घेतली असून त्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित केले जाणार आहे.
Share your comments