आजकाल शिक्षण घेऊन सुद्धा बऱ्याच वेळी नोकऱ्या लागत नाहीत. त्यामुळे जास्त तरुण शेती या व्यवसायात उतरतात.पारंपरिक पद्धतीचा अवलंब न करता नवनवीन प्रयोग शेतीमध्ये करून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवतात.सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील राजेंद्र देशमुख यांनी आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करून खजुराची शेती करत आहेत.खरंच यांचे शेतीचे नवनवीन प्रयोग प्रत्येक शेतकऱ्याने आत्मसात करायला हवे आहेत.
पारंपरिक पद्धतीने शेती:
खरंच आपल्या डोळ्यांना विश्वास बसणार नाही तर तुम्ही तिथं जाल तर तुम्हाला राजस्थान मध्ये आल्यासारखे वाटेल.राजेंद्र देशमुख यांनी उष्ण कटिबंधातील क्षेत्रात खजुराची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहे.1986 सालापासून राजेंद्र देशमुख यांनी वडिलांची 25 एकर जमिनीत शेती करत होते. तेव्हा ते पारंपरिक पद्धतीने शेती करायचे. पारंपरिक शेती बरोबर त्यांनी द्राक्ष सुद्धा लावली होती. परंतु सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे त्यांच्या द्राक्ष च्या बागेचे नेहमी नुकसान होयचे.
हेही वाचा:नोकरी सोडून केली शेती गुलाब फुलशेतीतून साधली प्रगती
लागवड प्रक्रिया:-
राजेंद्र देशमुख यांनी 3 एकर जमिनीत 2 हजार खजुराची झाडे लावली आहेत. त्या झाडामधील अंतर हे दोन ओळीत 18 फूट आणि 2 झाडात सव्वा दोन फूट एवढे अंतर होते. तसेच खजुराच्या झाडाला पाण्याची जास्त प्रमाणात गरज नसते. तसेच उन्हाळ्यात किमान एक वेळ पाणी दिले तरी चालते.कोरोना काळात लॉक डाउन मध्ये सुद्धा खजुराची विक्री त्यांनी 100 ते 120 रुपये प्रति किलो या दराने विकला आहे. तसेच या खजुराच्या शेतीतून देशमुख हे वर्ष्याला 3 लाख रुपये एवढे उत्पादन कमवतात.
ज्या जमिनीत पीक येत नाही तसेच कमी खते आणि कमी पाण्याच्या जीवावर राजेंद्र देशमुख यांनी खजुराच्या शेतीचा प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण केला.आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये या पिकाचे उत्पन्न खूपच कमी लोक घेतात. त्यामुळे राजेंद्र देशमुख यांनी केलेले कष्ट आणि चिकाटी, मेहन हे खूपच कौतुकास्पद आहे.
Share your comments