1. यशकथा

नोकरी सोडून केली शेती गुलाब फुलशेतीतून साधली प्रगती

KJ Maharashtra
KJ Maharashtra
rose farming

rose farming

 जर सध्याच्या तरूणाईचा विचार केला तर सरळ त्यांच्या डोक्यात एक गणित दिसते. ते म्हणजे चांगले शाखेमधून पदवी घेऊन किंवा इंजिनियरींग सारख्या पदव्या घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे आणि आपल्या आयुष्यात स्थायिक होणे हे होय. बरेच जण हा बऱ्याच दिवसापासून चालत आलेला आणि उरलेला मार्ग सोडायला तयार नसतात. परंतु या स्वतः भोवती असलेल्या चौकट युक्त  मनस्थिती ला फाटा देऊन मनात काहीतरी हटके करण्याच्या विचारात असतात आणि नुसते अशा तरुण विचार करून थांबत नाही तर मनात आलेला हटके विचार प्रत्यक्षात उतरवतात. या लेखामध्ये आपण अशा हटके काम करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांविषयी विषयी जाणून घेऊ.

 सुरज राऊत आणि साईनाथ चौधरी या दोन उच्चशिक्षित तरुणांनी बीई मेकॅनिकल चे शिक्षण पूर्ण केले आहे तसेच त्यांना एका खाजगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी देखील होती.  परंतु  मनात काही वेगळेच चालले होते. गावाकडे असलेल्या शेतीची ओढ  त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

 साईनाथ चौधरी हे शेंद्रा एमआयडीसी पासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या दुधड येथील गावचे रहिवासी आहेत. त्यांनीही बीई मेकॅनिकल चे शिक्षण पूर्ण केले असून ते हि शेंद्रे  एमआयडीसीत नोकरीला होते.. परंतु त्यांचे मन नोकरीत काही रमत नव्हते. म्हणून त्यांनी नोकरीला राजीनामा ठोकला आणि घरच्या शेतीत पॉलिहाऊसमध्ये गुलाब शेती सुरू केली. तसेच दुसरे सुरज राऊत कर सल्लागार असून औरंगाबाद मध्ये स्वतःचा फर्म  चालवतात.  कोरोना काळात सुरज राऊत  हे गावी गेल्यानंतर त्यांचेही मन गावाकडे रमले. दोघेही एकमेकांच्या सहकार्याने आपली फुलशेती फुलवत आहेत.

 याबाबत माहिती देताना साईनाथ चौधरी म्हणाले की, तीन वर्षापासून पॉलिहाऊसमध्ये गुलाबाची शेती करीत आहे. त्यांनी तळेगाव दाभाडे येथून बारा रुपयाला एक याप्रमाणे गुलाबाची रोपे लावली आहे. अर्ध्या एकरात जवळपास 20 लाखांचा खर्च येतो तर 60 टक्के अनुदान मिळते. अर्ध्या एकरात जवळजवळ 15 हजार रोपांची लागवड केली आहे. पुढे माहिती देताना त्यांनी सांगितले की गुलाब शेतीतून  जवळजवळ 365 दिवस फुलांची काढणी होते. रोपांची लागवड केल्यानंतर जवळ-जवळ तीन महिन्यांनी विक्रीयोग्य फुलांचे पीक येते. पॉलिहाऊस मधून फुलांची काढणी केल्यानंतर ती युक्ती पॅकिंग करून जवळच जालना रोड येथून मुंबई, नागपूर आणि हैदराबाद येथील मार्केटमध्ये फुले विक्रीसाठी पाठवतात.

 

 पुढे त्यांनी सांगितले की फुलांचा भाव किती पडला तरी तीन रुपये प्रति फूल याप्रमाणे ते विकले जाते. रोज काढणी केल्यानंतर सुद्धा अर्ध्या एकरात  1200 ते 1500 फुले येतात. याप्रमाणे शोध केला तर दररोज तीन ते साडेचार हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. यामधून मजुरी आणि खतांचा दीड हजारापर्यंत रोजचा खर्च वजा करून उरलेली रक्कम ही पूर्णपणे नफा असतो. हा सगळा हिशोब पकडला  तर महिन्याला अर्धा एकरामध्ये एक लाखापर्यंत उत्पन्न हाती मिळते. अशीच कहाणी सुरज राऊत यांचीही आहे. त्यांचे वडील भागीरथ राऊत हे नोकरी करत असल्याने सुरज राऊत हे ही औरंगाबाद मध्ये राहत होते. त्यांचे वडील दर आठवड्याला शनिवार आणि रविवार  गावी येऊन शेती करायचे. परंतु कुठे आहे त्यांनी सांगितले की कोरोना काळात राऊत हे  गावी आले आणि शेतीत लक्ष घातले. आधी ते  पूर्णवेळ व्यवसाय पाहत होतो आणि अर्धवेळ  शेती करायचे. परंतु आता ते अर्धा व्यवसाय करतात व पूर्णवेळ शेती करतात.

 सौजन्य- सकाळ

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters