भारत शेतीप्रधान देश आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही अवलंबून आहे ती बळीराजावर, शेती हा ग्रामीन अर्थव्यवस्थेचा पाया आहे नव्हे नव्हे तर शेती ही संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा आहे. आपल्या देशातले शेतकरी आपल्या स्वतःच्या जीवावर नावलौकिक कमावतात पैसा कमावतात, आज आम्ही अशाच एका जिद्दी शेतकऱ्याची कहाणी घेऊन आलो आहोत. बिना तालुक्यातील सतोरिया गावातील अजब सिंह कुर्मी रहिवासी आहेत. सहा वर्षापूर्वी अजब देखील इतर शेतकऱ्यांप्रमाणे पारंपारिक शेती करत होते. पण यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत नव्हते, एवढेच नाही तर अजबच्या डोक्यावर पंधरा लाखांचे कर्ज देखील झाले होते. मग शेवटी त्यांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत, आधुनिक पद्धतीने लसुन लागवड करण्याचा निर्णय घेतला, आणि एक एकर क्षेत्रात लसुन लागवड केली. लसुन पिकातून अजबला मोठा फायदा झाला, त्याच्या डोक्यावर असलेले सर्व कर्ज फिटले.
जेव्हा अजब ने एक एकर क्षेत्रात लसुन लागवड केली तेव्हा त्याचा संपूर्ण गाव त्याला चिडवत होता, परंतु लसुन लागवडीतून अजब ला चांगले उत्पन्न मिळाले, त्याची संपूर्ण लाइफस्टाइल बदलली. त्यामुळे गावातील इतर शेतकऱ्यांनी सुद्धा लसुन लागवड करायला सुरुवात केली. आणि त्यातून चांगले उत्पन्न देखील ते शेतकरी कमवीत आहेत. अजब सांगतात की, आज त्यांच्या गावात जवळपास दीडशे शेतकऱ्यांनी लसुन लागवड केली आहे. ही लागवड जवळपास एक हजार एकर क्षेत्रात केली गेली आहे. अजबला लसून लागवडीतून मिळालेल्या घवघवीत यशानंतर आजूबाजूच्या पंचक्रोशीत अजबचे नाव प्रसिद्धीस आले.
- हेही वाचा:-'या' महिन्यात करा काकडीची लागवड दोन महिन्यातच पीक तयार होते काढणीसाठी, मिळते बंपर उत्पादन
अजब आता पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना लसुन लागवडीविषयी मोफत प्रशिक्षण देखील देतात, तसेच ते ऑनलाईन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात तसेच अजब शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन देखील लसूण लागवडीची माहिती प्रदान करतात. अजब यांनी आपल्या स्वतःच्या वावरात दहा एकर क्षेत्रात लसुन लागवड केली आहे. अजब सांगतात की गावात मोठ्या प्रमाणात लसूण लागवड केली गेली असल्यामुळे गावातील जवळपास पाचशे लोकांना रोजगार मिळाला आहे आणि शेजारील गावातील जवळपास दोनशे मजूर गावात कामाला येते
अजब च्या माहितीनुसार त्यांना मिळालेल्या घवघवीत यशानंतर त्यांच्या तालुक्यात जवळपास 80 टक्के शेतकरी लसून लागवडीला प्राधान्य देताना दिसत आहेत आणि ते लसून लागवडीतून बक्कळ पैसा देखील कमवीत आहेत.
Share your comments