1. बातम्या

बाबोव! नंदुरबार च्या सुप्रसिद्ध सारंगखेडा घोडे बाजारात रावण घोड्याला तब्बल पाच कोटींची लागली बोली, जाणून घ्या याविषयी

दरवर्षी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात सारंगखेडा येथे मोठी यात्रा भरते, या यात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील विश्व प्रसिद्ध घोडेबाजार. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यांना सारंखेडा यात्रेला प्रशासनाने मंजुरी दिलेली नाही, मात्र असे असले तरी येथील विश्व प्रसिद्ध घोडे बाजार भरवण्यास मात्र प्रशासनाने अनुमती दिली आहे. त्या अनुषंगाने सारंगखेडा येथे घोडेबाजार पूर्णतः सजलेला आहे. आणि हा घोडेबाजार चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे, त्याचे कारण असे की घोडेबाजारात आलेल्या अश्वाना कोट्यावधी रुपयांची बोली लागत आहे. सारंखेडा घोडे बाजारात नाशिकचा रावण अश्व प्रमुख आकर्षणाचे केंद्र बनला आहे, या रावण अश्वाला तब्बल पाच कोटी रुपयांची बोली लागली आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
horse {symbolic picture}

दोन वर्षापासून संपूर्ण जगात कोरोना नामक महामारी पाय पसरवत होती, त्यामुळे संपूर्ण जग जणू थांबूनच गेले होते.  म्हणूनच विश्वप्रसिद्ध सारंगखेड्याची यात्रा देखील रद्द करण्यात आली होती. यंदा मात्र कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र दिसत असल्यामुळे प्रशासनाने सारंखेडा यात्रा तर नाही भरवली पण तेथील सुप्रसिद्ध अश्‍व बाजाराला मात्र परवानगी दिली. या अश्व बाजारात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, यंदा देखील या बाजारात कोट्यावधी रुपयांची उलाढाल बघायला मिळत आहे. यंदा घोडेबाजारात तब्बल 1119 अश्व विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

आणि अवघ्या चार दिवसात या यात्रेत तब्बल एक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे जाणकार सांगत आहेत. जरी या घोडेबाजारात अकराशे एकोणवीस अश्‍व दाखल झाले असतील तरी पण सर्वात जास्त लक्ष वेधले आहे ते रावन या अश्वाने. यात्रेत इतरही अश्वांना करोडोंच्या घरात बोली लागली आहे, पण रावणचा थाटच निराळा आहे, या रावणाला तब्बल पाच कोटी रुपयांची बोली लागली आहे. हा रावण अश्व अगदी रामायणातल्या रावणा सारखाच श्रीमंत असल्याचे सांगितले जात आहे.

रावणाच्या विशेषता

रावण अश्व हा नाशिकचा आहे, रावणाच्या मालकाचे नाव असद सय्यद असे आहे. रावणाच्या मालका नुसार, रावण हा अश्व अस्सल मारवाडी जातीचा आहे. तसेच त्याची उंची ही जवळपास 5 फूट 8 इंच आहे, सय्यद नुसार संपूर्ण घोडेबाजारात नव्हे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात रावणाच्या उंची येवढा अश्व नजरेला पडणार नाही, आणि हेच कारण आहे की रावणाला प्रचंड मागणी बघायला मिळत आहे.

रावण हा संपूर्ण काळ्या रंगाचा आहे आणि त्याच्या कपाळावर पांढरा टिळा आहे, यामुळेच रावण हा दिसायला खूपच आकर्षक आहे. रावणाला तब्बल पाच कोटीची बोली लागली असली तरी रावणाच्या मालकांनी रावणाच्या विक्रीला नकार दर्शवला आहे. रावणाच्या मालकाच्या मते, " मी रावणाला त्याचे लाड पुरवण्यासाठी आणले आहे, तसेच मी रावणाला विकत घेतले नसून रावणाला मला विकत घेतले आहे. त्यामुळे नोकर कधीच मालकाला विकू शकत नाही "

English Summary: in the famous sarangkheda horse market of nandurbar ravan horse got a bid of five crore Published on: 23 December 2021, 01:47 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters