संकटाचे केले सुवर्ण संधीत रुपांतर; केळीच्या शेतीतून कमावले लाखो रुपये

12 September 2020 11:08 AM


भिगवण : संकटाला संधी समजून काम केले पाहिजे असे आपण नेहमी म्हणतो. हे वाक्य एका शेतकऱ्याने अमंलात आणले आहे. कोरोना सारख्या वैश्विक महामारीच्या संकटाला संधी समजून काम करणाऱ्या एका शेतकऱ्याने लाखो रुपयांचे केळीचे उत्पन्न घेऊन प्रत्यक्षात आणले आणि इतर शेतकऱ्यांच्या समोर देखील एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.  इंदापुर तालुक्यातील मदनवाडी गावातील तुकाराम बंडगर यांनी आपल्या शेतात केळीचे पीक घेत लाखो रुपये कमावले.आज आपण त्यांच्या यशस्वी शेतीचे गमक जाणून घेऊया.

केळी सारखे जास्त पाण्याचे पीक घेण्याअगोदर तुकाराम बंडगर यांनी सर्व समस्यांचा अभ्यास केला.केळीला सुरुवातीलाच होणारी हुमनी केळी मध्ये निर्माण होणारे गवत आणि फळांच्यावर बसणारे मच्छर यापासून बचाव व्हावा यासाठी सुरुवातीलाच पूर्ण नियोजन केले.सात बाय पाच या अंतरावरती जैनची j९ जातीच्या केळीच्या रोपांची लागवड केली. साधारण साडे बाराशे रूपे एकरामध्ये लागवड केली आहे. पंधरा रुपयेप्रमाणे रोपे विकत घेतली आहेत. पानांना हिरवी आळी लागु नये आणि मुळ कुज होउ नये यासाठी औषध फवारणी केली. या औषध फवारणीचा खर्च कमीत कमी केला. मात्र फुटवे काढण्यासाठी वेळोवेळी मजूर लावून ते काम करण्यात येत होते. मजुरांना पगार वेळोवेळी द्यावा लागला.

हे पण वाचा : शास्त्रज्ञांना सापडला केळीवरील पनामाचा इलाज; केळी उत्पादकांची चिंता मिटणार

खतांचे व्यवस्थित व्यवस्थापन केल्याने केळी जोमदार आली आहे. तुकाराम बंडगर यांनी पिकासाठी बारामती एग्रोचे जैविक खत वापरले आहे. याचबरोबर ०:५२:३४ या खतांचा वापर विन चालू होत असताना १३:०:४५ ही  वापरले आहे. यानंतर शेवटच्या टप्प्यात पॉटॅश या रासायनिक खतांचाही वापर केला आहे. बंडगर यांच्या केळीचा आभ्यास करण्यासाठी पुणे कृषी विद्यापीठाची विद्यार्थीनी विशाखा कुंदन बंडगर हिने प्लॉटला भेट दिली आणि यशोगाथा समजून घेतली. केळी पिकाला सुरुवातीपासून साधारण दीड लाख रुपये एकरी खर्च अपेक्षित आहे. यामुळे किलोला चार ते पाच रुपये खर्च येतो.  केळीच्या लागवडीपासून रुपये मशागत खत बियाणे कामगार यावरती वेळच्या वेळी खर्च केल्यानंतर केळीला चांगला बाजार मिळाला तर केळीतून साधारण साडेतीन ते साडेचार लाख रुपये नफा मिळू शकतो. याचे उत्तम उदाहरण तुकाराम बंडगर यांचे आहे. दोन वर्षापुर्वी साडे पाच एकरात लागवड केली होती. यातुन २२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर यावर्षी १७ एकर केळीची लागवड केली आहे. निर्यातक्षम केळी असुनही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री केली.

 


केळीचे पीक चांगले येण्यासाठी बंडगर यांनी शेणखताचा वापर केला.साधारण एकारी सहा ट्रॉली शेणखत वापरले आहे.याबरोबरच ड्रिप मधून रासायनिक खतांचा वापर केला.शेणखताला ५० हजार रुपये खर्च केला आहे तर ड्रीप मधील खातांना २० ते २२ हजार रुपये खर्च केले आहेत.त्यामुळेच केळीला चांगला जोम बसतो असेदेखील यावेळी तुकाराम बंडगर यांनी सांगितले.

पीक व्यवस्थापनामध्ये शेतकऱ्यांनी सर्वाधिक खर्च खातांच्यावरती केला पाहिजे यानंतर गवत नष्ट करण्यासाठी सर्व अधिक प्रयत्न केले पाहिजे. केळी पिकामध्ये केळीचे फुटवे वेळच्यावेळी काढले तर नक्कीच उत्पादन वाढायला मदत होते असेदेखील बंडगर यांनी सांगितले. तुकाराम यांनी पाण्याच्या व्यवस्थापनासाठी ड्रिपची सोय केली आहे.रोपांच्या दोन्ही बाजूला ड्रिप टाकली असून यामधून खतेदेखील दिली जातात केळी पिकाला आवश्‍यक पाणी मिळावे.यासाठी २० डिस्चार्ज असलेली पाईप वापरायला हवी.शासनाच्या अनुदानाची वाट न पाहता शेतकऱ्यांनी पिकाचे पाणी व्यवस्थापन केले पाहिजे.शासन अनुदान देत असताना अनेक त्रुटी ठेवत असते.

यामुळे शासकीय अनुदानाची वाट न पाहता पीक व्यवस्थापन करावे आणि शेतकर्‍याने आपल्या सोयीने पाण्याची व्यवस्था करावी, असे देखील बंडगर पाणी व्यवस्थेबद्दल बोलताना सांगितले.एक एकरामध्ये साडेबाराशे रोपांची लागवड केली आहे.एका रोपाला ४० ते ५५ किलोपर्यंत केळी लागत आहे.एकरात सरासरी ४५ किलो प्रमाणे साडेबाराशे रोपांना सरासरी ४० टन केळीचे उत्पादन काढण्यात यशस्वी झाले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केळीला बाजार मिळत नसल्याने व्यापारी मनमानी भावाने खरेदी करत आहेत.तरीही बंडगर यांना ७ ते ९ रुपये दर मिळाल्याने एकरी ४ लाख रुपये मिळाले आहेत.

farmer banana farming banan producer farmer Successful Farmer यशस्वी शेतकरी केळी उत्पादक शेतकरी केळीची शेती शेतकरी
English Summary: The farmer turned the crisis into a golden opportunity, earning millions of rupees from banana farming

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.