1. फलोत्पादन

शास्त्रज्ञांना सापडला केळीवरील पनामाचा इलाज; केळी उत्पादकांची चिंता मिटणार

KJ Staff
KJ Staff


भारतीय कृषी संशोधन परिषद  ICAR शास्त्रज्ञांना केळी झाडावर होणारा सर्वात भयानक रोगाचा इलाज सापडला आहे. केळीच्या झाडावर येणाऱ्या या रोगामुळे अनेक केळी उत्पादक चिंतेत होते. अनेकांना केळीची शेतात या रोगामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. हा एक बुरशीजन्य रोग असून याला फ्यूझेरियम म्हणतात. हा रोग पनामा रोग’ म्हणूनही प्रसिद्ध आहे, यामुळे केळीच्या झाडाला त्रास होतो. प्रथमच भारतीय शास्त्रज्ञांनी या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी बायोपेस्टिसाइड तयार  केले आहे. हे बायोपेस्टिसाइड आणखी एक बुरशीजन्य पदार्थाचा वापर करून तयार केले गेले आहे.

बऱ्याच काळापासून केळी लागवड करणारे जगातील शेतकरी पनामा रोगाशी झगडत आहेत. हा रोग कॅव्हान्डिश प्रकारावर किंवा G-9 केळीच्या लागवडीवर परिणाम करतो. G-9 प्रकारची  केळी जगात सर्वाधिक प्रमाणात घेतली जाणारी  केळी आहेत. भारतात उत्पन्न घेतल्या जाणाऱ्या केळीपैकी ६० टक्क्यांपेक्षा जास्त जी-9 प्रकारातील केळी आहेत. बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तरप्रदेश या चार भारतीय राज्यांतील शेतकऱ्यांना  या आजाराचा तीव्र परिणाम झाला आहे.  हे सर्व अशी क्षेत्रे आहेत, जिथे कावेन्डिश वाण घेतले जाते. हा आजार इतका प्राणघातक आहे की, याला कधी-कधी ‘केळीचा कर्करोग’ म्हणूनही संबोधले जाते. या रोगाचा झाडावर असा परिणाम होतो कि, पाने मरण्यास सुरूवात करतात आणि वनस्पती मरण्यापूर्वी झाडाच खोड गडद तपकिरी होऊ लागते.

 

२०१७ मध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधील केळी पिकांना  मोठ्या प्रमाणात या आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. तेव्हाच आयसीएआरची केंद्रीय मृदा संशोधन संस्था, केळींच्या राष्ट्रीय संशोधन केंद्रासह, केंद्रीय उप-बागायती संस्था, यांनी ही समस्या सोडविण्याचा निर्णय घेतला. शास्त्रज्ञांनी याविषयी अभ्यास सुरू केला असता त्यात असे आढळले आहे की, आयसीएआरच्या शास्त्रज्ञांनी टोमॅटो आणि मिरच्यांमध्ये फुसेरियम विल्टसाठी प्रभावी एक वनौषधी तयार केले आहे. 

या औषधाचा केळीतील पनामा रोगाचा सामना करण्यासाठी उपयोग करण्याचे ठरविण्यात आले. या औषधाच्या सूत्रामध्ये बदल करण्याचे शास्त्रज्ञांनी ठरवले. केळीची लागवड भारतीय शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. एकरातून एक शेतकरी सरासरी ४ लाख रुपये कमवू शकतो. पण पनामा रोगांमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन आणि नफ्यामध्ये निम्म्याने घट होऊ शकते. ICAR  शास्त्रज्ञांनी केलेल्या या प्रयोगांचे परिणाम खूप उत्साहवर्धक आहेत. शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, ICAR या प्रयोगामुळे तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत केळीच्या लागवडीस पुनरुज्जीवन केले गेले आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters