आजकाल तरुण वर्ग शेती करण्याकडे वळला आहे. नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेतीतील उत्पादन वाढवण्यास तरुण शेतकरी मदत करत आहेत. उच्च शिक्षण घेतल्यानंतर युवा वर्ग परदेशात जाण्याचं स्वप्न बघत असतो. शिवाय आई-वडिलांचे देखील आपल्या मुलाने चांगल्या पगारावर नोकरी करावी अशी इच्छा असते. मात्र आता असे कितीतरी उच्चशिक्षित तरुण आपल्या जिद्दीच्या, ज्ञानाच्या जोरावर शेती क्षेत्रात अफाट यश मिळवताना दिसत आहेत.
अनेक तरुण उच्चशिक्षित असून नोकरीऐवजी शेती व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. शेती व्यवसायात नवनवीन कल्पनांचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत यश संपादन करत आहेत. पारंपारिक शेती सोबत आधुनिक शेतीची कास धरत लाखो रुपये कमवण्याची किमया साधता आहेत. युवा पिढीचे शेती व्यवसायातील यश नक्कीच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असेल.
असंच यश संपादन केलं आहे एका सोलापूर जिल्ह्यातील नवयुवकाने. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या बेगमपूर येथील शेतकरी बालाजी दत्तात्रेय यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीऐवजी शेती करण्यास प्राधान्य दिले. सध्या युवा शेतकरी बालाजी दत्तात्रेय हे वडिलोपार्जित साडेचार एकर शेतजमीनीतुन वर्षाकाठी पंधरा लाख रुपये कमवत आहेत.
जमिनीवर बसून जेवा आणि दैनंदिन आजारांच्या समस्येपासून मुक्त व्हा; वाचा जबरदस्त फायदे
त्यांनी शेतात भाजीपाला वर्गीय पिकांची तसेच फळबागाची लागवड केली आहे. त्यांनी डाळिंबाचे यशस्वी उत्पादन घेतले असून त्यांचे डाळिंब रिलायन्स सारख्या नामांकित कंपनीत विक्रीसाठी जात आहेत. तसेच त्यांनी उत्पादित केलेला भाजीपाल्यालाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद येत आहे. व्यापारी वर्ग तर त्यांच्या बांधावर येऊन भाजीपाल्याची खरेदी करतात.
यामुळे वाहतुकीसाठी होणारा खर्च वाचतो आणि सहाजिकच उत्पन्नात वाढ होते. डाळिंब पिकातून आणि भाजीपाल्यातून युवा शेतकरी बालाजी दत्तात्रेय यांना चांगलाच फायदा होत आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे. सोशल मीडिया वर त्यांची चांगलीच पकड आहे. फेसबुकच्या माध्यमातून ते शेतीतील बारकावे सांगतात.
आपल्या बरोबर इतर शेतकऱ्यांना देखील फायदा व्हावा या हेतूने ते फेसबुक वर पोस्ट करतात. या बाबतीत त्यांच्या कुटुंबीयांनी देखील त्यांना साथ दिली आहे. ते देखील फेसबुकद्वारे लोकांशी संवाद साधतात. त्यांचा सोशल मीडियाच्या प्रभावी वापरामुळे इतर अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येत आहे. बालाजी हे वर्षातून एका एकरात तीन भाजीपाला वर्गीय पिकांची शेती करतात. त्यामुळे याचा दर साठ दिवसांनी त्यांना चांगलाच फायदा होतोय.
सुरुवातीला बालाजी यांनी डाळिंबाची लागवड केली. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळाले आणि गेले तीन वर्षे बालाजी यांनी उत्पादित केलेला डाळिंब रिलायन्स सारख्या नामांकित कंपनीत विक्रीसाठी जात होता. त्यामुळे शेतकरी बंधूनीदेखील शेतीत असा बदल करणे गरजेचंच आहे.
ज्या शेतमालाची बाजारपेठेत गरज आहे त्याचेच उत्पन्न घेतले तर शेतकरी बांधवांनी बालाजी प्रमाणे शेती व्यवसायात बदल करणे अतिशय महत्त्वाचे आहे. बाजारपेठेत ज्या शेतमालाची अधिक मागणी आहे त्याच शेतमालाची शेतकरी बांधवांनी शेती करायला हवी. एकंदरीत काय बाजारात जे विकले जाते ते पिकवले तर निश्चितच शेतकऱ्यांना यातून चांगला फायदा मिळू शकतो.
महत्वाच्या बातम्या:
पावसाळ्याच्या तोंडावर राज्यमंत्री बच्चू कडूंचा मोठा गौप्यस्फोट; बियाणांबाबत मोठे वक्तव्य
7th Pay Commission: केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ! कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 'इतकी' वाढ
Share your comments