शेतकरी बंधू पारंपारिक शेतीबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरू करून स्मार्ट शेती करण्यावर भर देत आहे. शेती हा असा व्यवसाय आहे ज्यात अमाप कष्ट आणि पूर्वनियोजन हे लागतेच. मात्र शेतीचे योग्य व्यवस्थापन आणि नियोजन त्यांच्या कष्टाचे चीज करते. अशाच तरुण शेतकऱ्याने शेती व्यवसायात त्याने केलेल्या कष्टाचे गोड फळ त्याला मिळाले आहे. त्याच्या शेतीची सर्वत्र चर्चा होत आहे. शिवाय तो अनेकांसाठी प्रेरणादायी बनला आहे.
आदिवासीबहुल जोगा गावातील युवा शेतकरी सागर याने संत्रा बागेतून दहा लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. सागर याचे पदवीपर्यंत शिक्षण झाले असताना त्याने शेती व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले. आणि त्याला यशही मिळाले. आपल्या २० एकर शेतीपैकी त्याने १२ एकर शेतीमध्ये २००० संत्रा फळझाडांची लागवड केली. तसेच २ एकर मध्ये आधुनिक पद्धतीचा वापर करून म्हणजेच इस्राईल तंत्रज्ञान पद्धतीने संत्रा फळाची लागवड केली.
शिवाय ३ एकरात काकडी, टोमॅटो, फुलशेतीची लागवड केली. इस्राईल तंत्रज्ञान पद्धतीने केलेल्या संत्रा लागवडीतून सागर ने दहा लाखांचे उत्पन्न घेतले आहे. २०१५ मध्ये शासकीय राष्ट्रीय बाग वानी बोर्डाचे संचालक पनवार यांच्या मार्गदर्शखाली सागरने इस्राईल तंत्रज्ञान पद्धतीने संत्रा फळाची लागवड केली.आधुनिक पद्धतीने शेती करताना सागरने पारंपारिक शेतीला वगळले नाही. कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने फळांची लागवड केली.
कंपोस्ट खत, जैविक खत, शेण खत तसेच गांडूळ खताचा वापर मोठ्या प्रमाणात केला. तसेच ठिबक, तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला. अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानासोबत पारंपरिक पद्धतीची जोड दिल्याने सागर सगळ्यांसाठी प्रेरणा स्थान बनला आहे.
त्याची आधुनिक पद्धतीची शेती पाहण्यासाठी कारंजा तालुक्यातील आणि वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकरी गर्दी करतात. इस्राईल तंत्रज्ञान पद्धतीने शेती कशी करायची यासाठी २०१९ मध्ये शासनाच्या कृषी विभागातर्फे आयोजित केलेल्या इस्राईल शेती दौऱ्यात सहभागी झाला. व त्यातून सखोल माहिती मिळवली. तसेच बारामती येथे आयोजित केलेल्या कृषी विज्ञान शिबिरात देखील सहभागी झाला. सागर वर्धा जिल्हा अॅग्रोप्रोड्युसर संघटनेचा क्रियाशील सभासद आहे.
महत्वाच्या बातम्या;
कृषी कृषीपंपासाठी केली वीज चोरी;सहा शेतकऱ्यांवर झाली दंडात्मक कारवाई
Online Cow Dung Bussiness: गायीच्या शेना पासून बनणाऱ्या गोवऱ्या तुम्हाला बनवू शकतात लखपती
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोदी सरकारची खतांवरील सबसिडी वाढवण्याची घोषणा,14 कोटी शेतकऱ्यांना दिलासा
Share your comments