मध्यप्रदेश मधील रीवा जिल्ह्याच्या सेमराया तहसीलमधील मौजे मौहरा येथील आदिवासी महिला सोनिया एकेकाळी लोकांची शेतजमीन भाडेतत्त्वावर घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असत आता मात्र ही महिला स्वतःच्या पायावर उभे राहून कडकनाथ कोंबडी पालन करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत आहे. सोनिया केवळ आपल्या पायावर उभ्या राहिल्या असं नाही तर पती जो सुरत येथे मजुरी करत होता त्याला देखील आता आपल्या व्यवसायात हातभार लावण्यासाठी घरी बोलावून घेतले आहे.
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाने सोनिया यांचे आयुष्य बदलवून लावले आहे. दुसऱ्यांचे शेत भाडेतत्त्वावर घेऊन शेती करणारी ही महिला शेतकरी आता इतर महिलांसाठी आदर्श ठरत आहे. तिला या व्यवसायातून चांगला नफा मिळत असून ती लोकांना आता या व्यवसायाबाबत जागरूकही करत आहे. जेणेकरून त्यांच्याप्रमाणेच इतरांचेही नशीब बदलता येईल.
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय करून सोनिया आता महिन्याकाठी 15 हजारांची कमाई करत आहे. आधी सोनिया दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून मोठ्या मुश्किलीने आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत होती. त्यावेळी दोन्ही सांजचे जेवण देखील मोठ्या कष्टाने सोनिया यांना मिळत असे. सोनिया आधी अर्धा एकर दुसऱ्याची शेतजमीन तोडबटाईने करत असे आणि कसाबसा आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवीत असे.
उदरनिर्वाह व्यवस्थितरीत्या होतं नसल्याने तीचा पती सुरतला रोजगारासाठी गेला. इकडे सोनियाने शेतात काम करून आपल्या मुलाला वाढवले. मात्र आता ही महिला शेतकरी कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय करून अंडी आणि कडकनाथ कोंबडी विकून चांगली कमाई करू लागली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी तिने आपल्या पतीला सुरतहून परत बोलावून घेतले असून आता तोही आपल्या पत्नीला व्यवसायात मदत करत आहे.
सोनियाला आपला व्यवसाय अजून वाढवायचा असून महिन्याकाठी 50 हजार रुपयांपर्यंतची कमाई करायची आहे तसेच इतर लोकांना देखील आपल्या व्यवसायात सामाविष्ट करायचे आहे. आदिवासी कृषी विज्ञान केंद्रात एका प्रशिक्षण सत्रादरम्यान सोनियाने काही कृषी शास्त्रज्ञांची भेट घेतली आणि तिची परिस्थिती सांगितली, त्यानंतर कृषी शास्त्रज्ञांनी तिला कडकनाथ कोंबडी पालन करण्याचा सल्ला दिला, ज्यावर तिने होकार दिला आणि हा व्यवसाय छोट्या स्तरावर सुरू केला.
कृषी शास्त्रज्ञांनी त्यांना पशुसंवर्धन विभागाकडून काही पिल्ले मिळवून दिली आणि त्यांना वाढवण्यासाठी मार्गदर्शन करत राहिले. यामुळे सोन्याचा हा व्यवसाय थाटला गेला आणि आता सोनिया या व्यवसायापासून चांगली कमाई करत आहे. सोनियांकडे सध्या लहान-मोठे बऱ्याच कडकनाथ कोंबड्या आहेत. सोनियाने या व्यवसायातून चांगले उत्पन्न कमवीत चार खोल्यांचे घरही बांधले आहे. याशिवाय कडकनाथ कोंबडी ठेवण्यासाठी पूर्वी कच्च कुंपण होते, त्याचेही आता सोनियाने काँक्रिटीकरण केले आहे.
या व्यवसायातून मिळणाऱ्या मिळकतीपैकी निम्मी रक्कम ती तिच्या व्यवसायावर खर्च करत आहे. इतर प्रजातींच्या कोंबड्यांच्या तुलनेत कडकनाथची किंमत जास्त असते. कडकनाथ बाजारात 800 ते 1000 रुपयांना विकली जाते. मात्र सोनिया ही आदिवासी महिला कडकनाथ कोंबडी 600 ते 700 रुपयांना देते, याशिवाय 10 ते 15 रुपयांना अंडी विकते. इतर लोकांच्या तुलनेत स्वस्तात कडकनाथ कोंबडी विकूनही सोनिया ही महिला आदिवासी शेतकरी चांगले उत्पन्न कमवीत आहे.
संबंधित बातम्या :
Onion: डाळिंबरत्न बी.टी गोरेंचा राडा!! एकरात 25 टन कांद्याचे उत्पादन
Success: आदिवासी शेतकऱ्याने कारल्याची लागवड करून मिळवले लाखोंचे उत्पादन
Share your comments