1. यशोगाथा

Success: आदिवासी शेतकऱ्याने कारल्याची लागवड करून मिळवले लाखोंचे उत्पादन

अनेक शेतकरी बांधव निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) अक्षरशः बेजार झाल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे. वर्षानुवर्ष पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना (Farmer) मोठे नुकसान सहन करावे लागत आहे, यामुळे आता शेतकरी बांधव शेती तोट्याचीच असे म्हणू लागले आहेत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Bitter Gourd Farming

Bitter Gourd Farming

अनेक शेतकरी बांधव निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) अक्षरशः बेजार झाल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे. वर्षानुवर्ष पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना (Farmer) मोठे नुकसान सहन करावे लागत आहे, यामुळे आता शेतकरी बांधव शेती तोट्याचीच असे म्हणू लागले आहेत.

मात्र ठाणे जिल्ह्यात शेतीत काळाच्या ओघात बदल करून एका आदिवासी शेतकऱ्याने चांगले नेत्रदीपक यश मिळवले आहे. आपल्या उदरनिर्वाहासाठी भटकंती करणार्‍या आदिवासी शेतकऱ्याने शेतीमध्ये मिळवलेल्या या यशाची सर्वांकडून कौतुक केले जात आहे.

ठाणे जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील मौजे पास्ते येथील फडवळपाडा वस्तीवर राहणारे अशोक फडवळे या शेतकऱ्याने कारल्याची यशस्वी लागवड करून दाखवली आहे. शेतकरी अशोक वर्षानुवर्ष पावसाच्या पाण्यावर आधारित शेती (Bitter Gourd Farming) करत आले आहेत. पावसाळ्यात शेती आणि उन्हाळ्यात उदरनिर्वाह भागवण्यासाठी भटकंती हा त्यांचा जीवनप्रवास होता. विशेष म्हणजे त्यांच्या गावाजवळून पिंजाळ नदी वाहत होती मात्र नदिचा गावकऱ्यांना काहीच उपयोग होत नव्हता. कारण की या पाणी अडवण्यासाठी कोणताच बंधारा अस्तित्वात नव्हता.

यामुळे नदीला पाण्याचा खळखळाट असे मात्र शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाणीच मिळत नव्हते. मात्र, येथील रहिवासी शेतकऱ्यांनी मिळून आपल्या खर्चाने तात्पुरता बांध तयार केल्याने आता या गावकऱ्यांचा शेतीसाठी आवश्यक पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे. यामुळे शेतकरी अशोक गेल्या आठ वर्षांपासून कारल्याची शेती करत आहेत. डिसेंबर महिन्यात देखील अशोक यांनी कारल्याची शेती केली. विशेष म्हणजे त्यांनी केवळ दीड एकर क्षेत्रात कारल्याची शेती केली.

अमल श्री करिश्मा, कावेरी या जातीच्या 9 पॅकेट कारल्याची त्यांनी लागवड केली. फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेल्या कारल्यातून त्यांना उत्पादन मिळायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे कारले खरेदी करण्यासाठी सुरत हुन व्यापारी थेट त्यांच्या बांधावर हजेरी लावत आहेत. यामुळे अशोक यांना खर्च वजा जाता दोन लाखांचा निव्वळ नफा राहिला आहे. दीड एकर शेतीसाठी त्यांना सुमारे दीड लाखांचा खर्च आला होता याचाच अर्थ त्यांना एकूण उत्पन्न साडेतीन लाखांचे बसले होते. 

English Summary: Tribal farmers cultivate bitter gourd and earn million's Published on: 19 April 2022, 08:16 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters