1. यशोगाथा

शेतीपयोगी यंत्रांचा जादूगार अन शेती मध्ये नवनवीन कृषी यंत्र बनविणारा अवलिया! ..... श्री नामदेवराव आनंदराव वैद्य

नमस्कार मंडळी आपन कृषी अवजारे व यंत्रे तर खुप बघीतले असेल त्याचं बरोबर वापरही केला असेल पण घरगुती वापरात येणारे साठी साहित्य घेऊन शेती मध्ये उपयोग घेऊन नवनवीन यंत्राचा जणु एक वसा च घेतला कि काय असे वाटते.त्यांनी त्याची पेरणी सुरुवात केली.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
namdeorao aanadrao vaidya make a various machinary for farming use

namdeorao aanadrao vaidya make a various machinary for farming use

नमस्कार मंडळी आपन कृषी अवजारे व यंत्रे तर खुप बघीतले असेल त्याचं बरोबर वापरही केला असेल पण घरगुती वापरात येणारे साठी साहित्य घेऊन शेती मध्ये उपयोग घेऊन नवनवीन यंत्राचा जणु एक वसा च  घेतला कि काय  असे वाटते.त्यांनी त्याची पेरणी सुरुवात केली.

जेव्हा शेती हंगामाच्या वेळी शेतकयांना जेवणाची फुरसत नसते. बियाणे खरेदीसोबत यंत्रांची जुळवाजुळव त्यांना करावी लागते. ४९ एकर शेती  असणारा शेतकरी श्री नामदेवराव वैद्य यांना दरवर्षीच या समस्येचा सामना करावा लागायचा. २०१६ साली त्यांनी कपाशी लावली. रासायनिक खत देण्याचा मजुरांचा खर्च प्रचंड वाढला. परवडत नसल्याने स्वतचे खत पेरणी यंत्र तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. जवळच्या फॅब्रिकेटरकडे जाऊन हव्या त्या डिझाईनचे यंत्र  स्वतः ची बुद्धी लाऊन तयार केले. त्यासाठी अधिकाधिक घरगुतीच साहित्यच वापरले. दोन-चार वस्तूच बाजारातून घ्याव्या लागल्याने बाजारात मिळणान्या यंत्रापेक्षा अतिशय कमी खर्चात हे यंत्र तयार झाले. त्यामुळे पैशाची बचत, सोबत कामसुद्धा सोपे झाले. यंत्राबाबत इतर शेतकऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी नामदेव यांच्याकडे विचारणा केली आणि एकामागून एक यंत्रांची मालिका सुरू झाली.तुरीचं कापनी यंत्र हे हातात तयार करून शेतकर्यना याचं मार्गदर्शन सुद्धा केलें.नामदेवराव वैद्य यांनी गावातील शेतकरी यांच्या माध्यमातून कास्तकार सोया फार्मर प्रोड्युसर कंपनी ची स्थापना करून कडधान्यावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा अशी विविध पिके नामदेवराव घेतात.स्वता शेती मध्ये काम करत असताना इतर क्षेत्राप्रमाणे यांनी आपला ठसा उमटवला आहे.

अलीकडील काळात त्यांनी गरजेनुसार काही यंत्रे घेतली. तसेच काही विकसित केली वा त्यात सुधारणा केल्या. त्याबाबत जसे ट्रॅक्टरचलित खत देणारे यंत्र या यंत्राद्वारे शेणखत किंवा गांडूळ खत या स्वरूपातील खत देता येते. एकावेळी सुमारे तीन क्विंटल पर्यंत देणे शक्य होते. सोयाबीन, कापूस, हरभरा, तीळ आदी पिकात त्याचा वापर पेरणीपूर्व काही दिवस आधी करता येतो. एका दिवसात सुमारे २० ते २५ एकरांपर्यंत वापर शक्य होतो. ट्रॅक्टर चालवण्यासाठी चालक व खत देणारी व्यक्ती असे दोनच लोक पुरेसे ठरतात. एकरी दोन ते अडीच लिटर डिझेल लागते. पूर्वी याच कामासाठी दहा मजुरांची गरज भासायची. आता हे बळ कमी होऊन त्यावरील खर्चही कमी झाला आहे. कापूस पेरणी यंत्र राजस्थानातून कापसाचे बियाणे ठेवण्यासाठी दोन बॉक्स आणले. कपाशी यंत्राचे बाकी ‘डिझाईन’ नामदेवराव यांनी आपल्या गरजेनुसार केले आहे. यात जुन्या काकऱ्यांचा वापर केला. चाके मार्केटमधून घेतली. बैलचलित या यंत्राद्वारे दिवसभरात सहा एकर काम पूर्ण होते. साडेपाच हजार रुपये या यंत्राची किंमत आहे. कटर मशिन कपाशीची काढणी झाल्यानंतर उर्वरित भागांचे तुकडे करून त्याचे अवशेष शेतातच पसरविण्याचे काम हे यंत्र करते. सुमारे एक लाख ८० हजार रूपयांत ते खरेदी केले आहे. दिवसाला तीन ते चार एकरांपर्यंत या यंत्राद्वारे काम होते. यंत्र वापरण्यासाठी एक मनुष्य पुरेसा ठरतो. डिझेल एकरी चार लिटर लागते. अवशेष कुजल्यानंतर त्याचे खत तयार केले जाते. अलिकडेच तूर पिकासाठीही केवळ दोनशे रुपयांच्या साधनसामग्री आधारे कटर यंत्र तयार केले आहे. फवारणी पंपाच्या बॅटरीचा आधार त्यासाठी घेतला आहे. हे यंत्र वापरण्यासाठी केवळ एक मनुष्य पुरेसा असतो.

 पेरणी यंत्र हे यंत्र सोयाबीन तसेच मका, हरभरा, उन्हाळी मूग ,तीळ आदी पिकांतही वापरता येते. त्यास पीकनिहाय सहा प्रकारच्या प्लॅस्टिक चकत्या त्यास जोडता येतात. दिवसभरात पाच एकरांपर्यंत काम त्याद्वारे होते. बैलचलित हे यंत्र चालवण्यासाठी एक व्यक्ती पुरेशी ठरते. पेरणी झाल्यानंतर सरी झाकण्यासाठी देखील सुविधा केली आहे. कपाशीला खत देणे श्री नामदेवराव यांनी आपल्या गरजेनुसार हे यंत्र स्थानिक कार्यशाळेत तयार केले आहे. कपाशी व्यतिरिक्त उसाला त्याचा वापर होऊ शकेल असे ते म्हणतात. दिवसभरात ६ एकरांचे काम हे यंत्र दोन व्यक्तींमध्ये होते. पूर्वी याच कामासाठी एकरी तीन मजूर लागायचे. आता एका मजुराची दिवसभराची मजुरी ३०० रुपये गृहित धरली तरी दिवसभरात सहाशे रूपयांत हे काम होते. या यंत्रास दोन्ही बाजूस दाते आहे. तीन रॉडसचा आधार घेऊन घमेले बसवले आहे.  वारसा त्यांचे शेती च क्षेत्र मोठे असल्याने मजूर उपलब्धतेची मोठी अडचण निर्माण व्हायची. ती पाहता २०१४ मध्ये ट्रॅक्टर खरेदी केला. त्यासोबतच पेरणी यंत्रही घेतले. गरज वाढल्यानंतर डिसेंबर २०१६ मध्ये अजून एक ट्रॅक्टर खरेदी केला. ट्रॅक्टरच्या वरील बाजूचा टप काढून दोन्ही बाजूंना २५ लिटर क्षमतेचा पंप बांधून तुरीवर फवारणी करण्याचा प्रयोग केला.

कापूस एकरी १३ ते १४ क्विंटल, सोयाबीन १२ क्विंटल, हरभरा ९ ते १० क्विंटल असे उत्पादन ते घेतात. प्रयत्न, कौशल्य व कार्याची दखल घेत राजीव गांधी फाउंडेशनच्या वतीने कृषी रत्न पुरस्काराने नामदेव यांचा गौरव करण्यात आला त्याच बरोबर कृषी विज्ञान केंद्र घातखेड यांनी

श्री नामदेवराव वैद्य यांना दोन वेळेस पुरस्कार देऊन सन्मानित केले.धामणगाव रेल्वे येथे तालुकास्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.नवनविन तंत्र विकसित करण्यास उत्सुक आहे अश्या या अवलिया चे भविष्यात सुद्धा नविन प्रयोग यशस्वी झाला पाहिजे अशी आशा व्यक्त करतो..... धन्यवाद

श्री नामदेवराव वैद्य

९८९०७२३१६१

कृषी यंत्रा चे जनक

माहीती संकलन

मिलिंद जि गोदे

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:शेतीमध्ये आता 'हाच' एकमेव पर्याय, पंजाबराव डख यांनी सांगितले गुपित

नक्की वाचा:शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोदी सरकारची खतांवरील सबसिडी वाढवण्याची घोषणा,14 कोटी शेतकऱ्यांना दिलासा

नक्की वाचा:कमी खर्चात आंब्याचे जास्त उत्पादन आहे शक्य! आंबा लागवडीसाठी घन लागवड पद्धत ठरेल फायद्याच

English Summary: namdeorao aanadrao vaidya make a various machinary for farming use Published on: 27 April 2022, 06:59 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters