शेती व्यवसायात भरभराटी येण्यासाठी शेतकरी बरेच नवनवे प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोग करून तरुण शेतकऱ्याची यशोगाथा सातासमुद्रापार गेली आहे. त्याच्या या नवख्या प्रयोगामुळे इतरांनादेखील प्रोत्साहन मिळाले आहे. हा तरुण म्हणजे भोरमधील किरण यादव. पारंपारिक शेतीला फाटा देत शून्य (Farm Cultivation) मशागत शेतीचा अत्याधुनिक उपक्रम करत किरणने भरघोस यश मिळवले.
शून्य (Farm Cultivation) मशागत शेती हा प्रयोग केल्यामुळे कमी खर्चात अधिकाधिक उत्पादन झाले. किरणचा हा अत्याधुनिक उपक्रम पाहण्यासाठी परदेशी पाहुणे थेट बांधावर दाखल झाले होते. किरण यांनी केलेल्या या उपक्रमामुळे त्यांना शासनाकडूनही अनेक पारितोषिके मिळाली आहेत. आता या भागातील शेतकऱ्यांसाठी त्याचा हा प्रयोग नवसंजीवनी ठरत आहे.
शेतकरी उत्पादन जास्त व्हावे यासाठी शेतीव्यवस्थापन आणि पूर्वनियोजन करत असतात. यात बऱ्याचदा अधिक खर्चही होतो. मात्र तेवढा खर्च करूनही हवे तसे उत्पादन न झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटकाही बसतो. त्यामुळे उत्पादनावर खर्च करून अधिकाधिक नफा मिळवणे हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांकडे आहे. त्याच अनुशंगाने माळवाडी येथील किरण यादव यांनी शून्य मशागत शेती अर्थात एस.आर.टी अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन घेण्यास सुरुवात केली. यामुळे उत्पादनावरील खर्चात बचत होत आहे. तसेच पीक उत्पादनात वृद्धी होऊन शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग प्रेरणादायी ठरत आहे.
शून्य मशागत शेती या तंत्रज्ञानाच्या वापर करून होत असलेल्या आधुनिक शेतीची पाहणी करण्यासाठी चेरी टेन हे सिंगापूरहून तर एडम ब्लाईट ऑस्ट्रेलियाहून हे परदेशी अभ्यासक माळवाडी शिवारात दाखल झाले होते. बायर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सुहास जोशी हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. किरण यादव याचा उत्पादनवाढीसाठी केलेला प्रयोग यशस्वी झाल्याने त्याचे कौतुकही केले.
तसेच कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी बारामती येथील डॉक्टर संतोष भोसले आणि डॉ. विवेक भोईटे यांनी देखील उपस्थिती दर्शवली. कृषी विज्ञान केंद्राकडून शून्य मशागत शेती मार्गदर्शन आणि शिवार भेट दौरा आयोजित करण्यात आला होता. जगभरात आता येथील प्रगतशील शेतीचे उदाहरण दिले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
Breaking News : शेतकऱ्यांना मोदी सरकार अक्षयतृतीयेला देणार एक खास भेट; वाचा काय आहे माजरा
शेतकऱ्यांच्या मागे लागलेली साडेसाती काही संपेना, आता शेतकऱ्यांवर दुहेरी संकट..
दिलासादायक निर्णय! आता दीड लाख शेतकऱ्यांना मिळणार प्री-पेड मीटर
Share your comments