1. यशोगाथा

अमेरिकेतील लाखो रुपयांची नोकरी सोडून हा तरुण करतोय दुधाचा व्यवसाय, महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल

राजस्थान राज्यात बसनवाडा हे एक गाव आहे त्या गावच्या ठिकाणी एक राजेश्वरी कॉलनी आहे त्या कॉलनी मध्ये एक ३६ वर्षीय तरुण राहतो. तो ३६ वर्षीय तरुण आज तेथील लोकांचे प्रेरणास्थान बनलेला आहे जे की प्रति वर्ष तो ३७ लाख रुपये कमावतो. फक्त ३७ लाख रुपये या कारणांमुळे नाही तर तो शेतीपूरक व्यवसायातून एवढ्या पैशांची कमाई करत आहे

किरण भेकणे
किरण भेकणे
milk

milk

राजस्थान राज्यात बसनवाडा हे एक गाव आहे त्या गावच्या ठिकाणी एक राजेश्वरी कॉलनी आहे त्या कॉलनी मध्ये एक ३६ वर्षीय तरुण राहतो. तो ३६  वर्षीय  तरुण  आज  तेथील  लोकांचे प्रेरणास्थान बनलेला आहे जे की प्रति वर्ष तो ३७ लाख रुपये कमावतो. फक्त ३७ लाख रुपये या कारणांमुळे नाही तर तो शेतीपूरक व्यवसायातून एवढ्या पैशांची कमाई करत आहे.

चांगल्या पगाराची नोकरी सोडली :

अनुकूल जैन असे या तरुणाने नाव आहे. अनुकूल ने भारतीय बँकिंग आणि वित्त संस्था मधून पदवी घेतली आणि चांगल्या पगाराची नोकरी पकडली. २००८ मध्ये त्याने बँक ऑफ अमेरिका च्या लाखो रुपये पगारावर नोकरी केली याव्यतिरिक्त त्याने अजून बऱ्याच बँकांमध्ये काम केले मात्र त्यामध्ये त्याला रस येत नसल्याने त्याने ती नोकरी सोडली.अनुकूल जैन ने त्याच्या भावाच्या नावाने एक गौशाळा सुरू केली त्या गौशाळेचे नाव "अनमोल गैर गौशाळा". अनुकूल काही दिवस त्याची नोकरी आणि गौशाळा ही दोन्ही कामे करत होता.

हेहि वाचा:गोंदीयात ही महिला पिकवतेय सेंद्रिय शेती, देशी विदेशी भाज्यांची लागवड

परंतु त्याला त्याच्या नोकरीमध्ये लक्ष लागत न्हवते आणि हळू हळू गौशाळा मध्ये त्याचे लक्ष लागू लागले त्यामुळे २०१८ मध्ये एक रिस्क घेत त्याने निर्णय   घेतला  आणि  आपल्या  नोकरीला रामराम ठोकून आपल्या गावी म्हणजेच बनसवाडा मध्ये राहिला.अनुकूल ने सुरुवातीला म्हणजेच २०१७ मध्ये आपल्या गौशाळेची सुरुवात केली ती म्हणजे पहिल्या  ७  गायी. जेव्हा  सुरुवात केली त्यावेळी त्याला अनेक संकटांना सामना करावा लागला मात्र आजच्या घडीला ७ गायींवरून १३५ गायी झाल्या आहेत. यामध्ये सर्वात विशेष बाब म्हणजे सर्व गायी देशी आहेत.

सुरुवातीला अनुकूल ने गुजरात मधील गैर जातीच्या ७ गायी ८० हजार ते १ लाख रुपयांना खरेदी केल्या. गौशाळेला आज ३ वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र सुरुवातीला जेव्हा चालू केले त्यावेळी चारा कसा आणि कुठून आणायचा हे सुद्धा शक्य असेल का नाही माहीत न्हवते मात्र जिद्दीने चालू केलेला व्यवसायास मार्ग दिसतोच.दिवसाला जवळपास १५० लिटर पेक्षा जास्तच दूध लागते आणि दूध घेणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा वाढतच चाललेली आहे. सुमारे ७० रुपये प्रति लिटर ने दूध विकले जाते. वार्षिक उलाढाल ३७ लाख रुपये होते त्यामधून २५ लाख नवीन गायी आणि चारापाणी साठी जाते आणि बाकीचे जे राहिले आहे तो फायदा आपल्यास होतो.

English Summary: Leaving a job worth lakhs of rupees in America, this young man is doing dairy business, turnover of lakhs of rupees per month Published on: 27 August 2021, 12:23 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters