1. यशोगाथा

गोंदीयात ही महिला पिकवतेय सेंद्रिय शेती, देशी विदेशी भाज्यांची लागवड

प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडी नुसार आपल्या क्षेत्रात उतरतो आणि काम करत असतो जे की आजकाल तर प्रत्येक महिला सुद्धा वेगवगेळ्या क्षेत्रात काम करताना दिसत असतात.आपल्याला ग्रामीण भागातील असे चित्र दिसते की महिलांना आवड नसूनही नाईलाजाने त्या शेतीकडे ओळत असतात.परंतु गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मध्ये राहणाऱ्या नीता ओंकार लांजेवार यांनी आपले उच्च शिक्षण घेऊन आपला कल शेतीकडे ओळवला आहे आणि तेथील परिसरात त्यांनी आपला एक आदर्श निर्माण केलेला आहे. आज आपण जाणून घेऊयात की नक्की त्या कोणत्या प्रकारे शेती करत आहेत.

किरण भेकणे
किरण भेकणे
vegetables

ब्राह्मणटोला शिवारात एक एकर शेती विकत घेतली:-

नीता लांजेवार या तरुणाने ब्राम्हणटोला इथे शेती विकत घेतलेली आहे जो की गोंदिया जिल्हा म्हणले की तिथे सर्वत्र धान शेती केली जाते.सध्या आपल्या शेतीत जर चांगले उत्पन्न घ्यायचे असेल तर सर्वत्र रासायनिक खते व कीटकनाशके वापरतात आणि त्यामुळे आपला दैनंदिन आहार विषयुक्त झालेला आहे.सध्याच्या युगात आपण अन्नधान्य, भाजीपाला किंवा जी फळे खात आहोत ती शुद्ध आहेत की विषयुक्त हे आपल्याला माहीतच नाही आपला विश्वास सुद्धा यावर नाही.

हेही वाचा:बाप रे! ज्या प्रकारची शेती करता येणार नाही त्यामधून या तरुणाने लाखो रुपये उत्पन्न काढले

मात्र असे बोटावर मोजण्यावढे शेतकरी आहेत जे उत्पादन कमी निघाले तरी चालेल मात्र सेंद्रिय शेतीच करणार असे म्हणतात आणि त्यामधील एक तरुण शेतकरी म्हणजे नीता लांजेवार.नीता या तरुणीने अगदी चांगल्या प्रकारे नियोजन करून ठिबक सिंचन सुविधा केलेली आहे आणि तिचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे.नीता यांनी आपल्या  शेतामध्ये  झुकीनी व  इतर परदेशी पिकांची लागवड केली आहे. झुकीनी ही भाजी परदेशी असल्यामुळे ग्राहक तिकडे लक्ष देत न्हवते मात्र अत्ता त्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. नीता यांनी त्यांच्या १ एकर क्षेत्रात फळभाज्या, पालेभाज्या व फुलशेतीचा प्रयोग सेंद्रिय पद्धतीने केला आहे.

बाजारात जास्तीत जास्त ग्राहक अत्ता सेंद्रिय शेतीचा माल घेत आहेत त्यामुळे त्यांनी व्हाट्सएप ग्रुप केला आहे आणि त्या ग्रुप वर रोज भाजीपाला ची नोंद  केली जाते. त्यामुळे  अत्ता  ग्राहक कोणती भाजी पाहिजे ते सांगतात आणि त्या प्रमाणे भाजी तोडून पॅक करून ग्राहकांपर्यंत पोहचवणे सुरू आहे.

English Summary: In Gondia, this woman grows organic farming, native and exotic vegetables Published on: 26 August 2021, 07:40 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters