मनदीप हा मूळचा हिमाचलचा असून, मनदीपने एमबीए पूर्ण केल्यानंतर मॅनेजर म्हणून करिअरला सुरुवात केली. तो कधीच शेतीकडे परत येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते, पण कदाचित निसर्गाने त्याच्यासाठी काहीतरी वेगळेच ठेवले असेल. जवळपास ५ वर्षे एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम केल्यानंतर अचानक मनदीप वर्मा यांनी कुटुंबासह सोलन शहरात येण्याचे ठरवले.
सोलनला परत आल्यावर मनदीपने आपल्या नापीक जमिनीवर शेती करण्याचा विचार केला. पण त्याला सर्व शेतकऱ्यांप्रमाणे पारंपरिक शेती करायची नव्हती. काहीतरी वेगळे करण्याच्या विचाराने त्याला बागायतीकडे वळवले, त्यानंतर मनदीपने जे कल्पनेच्या पलीकडे होते ते केले. मनदीपने प्रथम आपल्या भागातील हवामानाची संपूर्ण माहिती घेतली.
या लागवडीची माहिती घेण्यासाठी विद्यापीठातील प्राध्यापकांची भेट घेतली आणि शेवटी त्याने किवीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. मनदीप वर्मा सांगतात की, किवीबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी त्यांनी बहुतेक वेळ लायब्ररीत घालवला. अनेक पुस्तके वाचली आणि विद्यापीठातील प्राध्यापकांसोबत शेतीवर चर्चाही केली. ही सर्व माहिती मिळाल्यानंतर मनदीपने किवीची लागवड करण्यास सुरुवात केली.
बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा आर्टिफिशियल इंटेलिजेंस मधील संशोधनाबाबत सामंजस्य करार
मनदीप वर्मा म्हणाले की, सोलनच्या फलोत्पादन विभागाशी बोलल्यानंतर त्यांनी 2014 मध्ये 14 बिघा जागेवर किवी गार्डन बनवण्याचे काम सुरू केले. या बागेत त्यांनी किवीच्या प्रगत जातीची लागवड केली. 2017 मध्ये त्यांनी किवीच्या पुरवठ्यासाठी वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंग सुरू केले. या वेबसाईटवर त्यांनी फळ कधी तोडले.
गाळप परवाना उल्लंघन प्रकरणी राज्यातील 22 कारखान्यांना दणका! कोटींचा झाला दंड...
ते बॉक्समध्ये कधी पॅक केले याची सर्व माहिती दिली. त्याची फळे हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा येथे ऑनलाइन विकली जातात. मनदीप वर्मा किवी फळ पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने तयार करतात. एवढेच नाही तर ते स्वतः खत आणि जैव खते तयार करतात.
शासनाच्या दृष्टीने दारू किती महत्वाचीय माहितेय का? सरकारची तिजोरी फुल झालीय, विक्रीत 25 % वाढ
मे महिना आहे खुपच उष्ण, पशुधनाची घ्या अशी काळजी..
हे झाड बदलणार शेतकऱ्यांचे नशीब! लागवड करा आणि करोडपती व्हा...
आता मजुरांनाही मिळणार विम्याचा लाभ, जाणून घ्या...
Share your comments