1. यशकथा

बाजारात टोमॅटोला चांगला भाव नसल्यामुळं फेकण्या ऐवजी या तरुणाने केला चक्क टोमॅटो वर प्रयोग,आता कमवतोय लाखो रुपये

KJ Maharashtra
KJ Maharashtra
tomato

tomato

आपला भारत देश हा एक कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशातील 90 टक्के लोकांचा व्यवसाय हा शेती आहे. त्याचबरोबर  शेती  सोबत  पशुपालन आणि दुधव्यवसाय हे पूरक व्यवसाय शेतकरी  करतो. आपल्याला पहिल्यापासूनच माहीत आहे. बाजारपेठे मध्ये शेतकऱ्याच्या पिकाला आणि धान्याला कधीच योग्य तो भाव मिळत नाही.

प्रक्रिया करून टोमॅटोच्या भावापेक्षा चौपट पैसे:

बऱ्याच वेळा पिकाला योग्य बाजार भाव न मिळाल्या मुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना आपले पिकवले पीक किंवा धान्य काही वेळेस रस्त्यावर सुद्धा टाकावे लागते. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे डबघाईला येत असतो.बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना शेतीमध्ये पिकात घातलेला पैसा सुद्धा निघत नाही. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना शेतीतील उत्पन्न  हे अंगलट येते.नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या तरुणाबद्दल सांगणार आहे ज्याने  टोमॅटोला  भाव नसल्यामुळे ते टोमॅटो फेकून देण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून टोमॅटो च्या भावापेक्षा चौपट पैसे कमवत आहे.

हेही वाचा:योग्य विक्री व्यवस्थापनामुळे सीमाताई जाधव ठरल्या विविध पुरस्कारांचे मानकरी

मध्य प्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावात हा तरुण राहतो. त्या तरुणाचे समीर गोस्वामी नाव आहे.समीर गोस्वामी या शेतकऱ्याने आपल्या शेतात टोमॅटो ची लागवड केली  होती.  परंतु  कोरोना  सारख्या महामारी ने बाजारपेठा बंद होत्या त्याबरोबर च भाव सुद्धा कवडीमोल होता. या मुळे टोमॅटो त्याला विकता आले नाहीत. पूर्ण टोमॅटो च्या शेती मधून त्याला 10 टन टोमॅटो एवढे उत्पन्न निघाले होते.बाजारपेठा बंद असल्यामुळे त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते परंतु या तरुणाने एक शक्कल लढवली आणि टोमॅटो वरच प्रकिया केली.

टोमॅटो वर प्रक्रिया करून त्याने त्यापासून पावडर बनवली. 10 टन टोमॅटो पासून त्याने 700 किलो एवढी पावडर तयार केली.या पावडर ला बाजारात 1 क्विंटल ला 25 हजार रुपये भाव मिळाला. आणि यातुन या तरुणाला लाखो रुपये मिळू लागले. या पावडर विक्रीतून समीर ला 2 लाख रुपये एवढा निव्वळ फायदा झाला.या पुढे त्याने शेतात आले आणि हळद सुद्धा लावायला सुरवात केली. निघालेल्या आल्याची आणि हळदीची पावडर बनवून सुद्धा तो पैसे कमवू लागला.तुम्हाला समजलच असेल की शेती मध्ये नवनवीन प्रयोग करणे किती गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञान प्रणाली आणि आधुनिक प्रकारे शेती करणे खूप गरजेचे आहे.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters