1. यशोगाथा

Inspirational:वाचा 'या' ठिकाणच्या शेतकऱ्यांची कोथिंबीर लागवड पद्धत व प्रचंड नफा कमावण्याची हातोटी, होईल फायदा

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
corriender crop

corriender crop

 कोथिंबिर पीक कमी कालावधीत येणारे असून खूप कमी वेळात शेतकऱ्यांना बऱ्याचदा खूप मोठा आर्थिक नफा देऊन जाते. पावसाळ्यात देखील कोथिंबीरची लागवड केली तर शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. सोप्या पद्धतीने कोथिंबीरीचे पावसाळ्यात लागवड व नियोजन करणे देखील तितकेच गरजेचे आहे. कोथिंबीर पासून पावसात देखील चांगले उत्पादन व नफा मिळू शकतो हे उत्तर प्रदेश राज्यातील हरदोई जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.

या विभागात सगळ्यात जास्त प्रमाणात खूप दिवसांपासून कोथिंबीर ची लागवड करण्यात येते व या भागातील कोथिंबिरीला एक सर्वोत्तम मागणीदेखील आहे. याच गावातील शिवकुमार नावाचे एक शेतकरी पावसाळ्यात कोथिंबिरीची लागवड करतात

व त्यांचे म्हणणे आहे की त्या दिवसात पिकवलेल्या कोथिंबिरीला बाजार देखील चांगला भाव मिळतो. या दिवसांमध्ये पिकवलेली कोथिंबीर तीनशे रुपये किलो या दराने बाजारात विकले जाते. पावसाळ्यात बऱ्याचदा कोथिंबीरीची टंचाई निर्माण झाल्यामुळे 10 रुपये जुडीपर्यंत विकली जाते.

नक्की वाचा:Cultivation Of Vegetables: कमी मेहनत जास्त उत्पन्न; 'या' भाजेपाल्याची कधीही करा लागवड

या शेतकऱ्यांची कोथिंबीर लागवड पद्धत आणि नियोजन

 हे शेतकरी जून व जुलै महिन्यामध्ये शेताचे खोल नांगरणी करून शेतातील गवत व इतर पिकांचे अवशेष त्याचं शेत स्वच्छ करतात.  जर शेतामध्ये जास्त तणाचा प्रादुर्भाव असेल तर पेरणी करणे अगोदरपंधरा दिवस आधीच शेताला तणनाशक वापरतात.

फवारणी केल्यामुळे शेतातील तण नष्ट होते व शेतात तयार करण्यापूर्वी ते चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरवतात. शिव कुमार यांनी याबाबत सांगितले की नागरनी केल्यानंतर योग्य प्रमाणात डीएपी आणि पोटॅशचा वापर करून रोटावेटर मारून शेत भुसभुशीत केली जाते.

तसेच ते कोथिंबीर लागवडीसाठी हिस्सार सुगंधा बियाणे वापरतात. त्यांचे म्हणणे आहे की कोथिंबीर पेरणी केल्यानंतर त्याची उगवण लवकर होते व पावसाळ्यामध्ये बांध बांधून ते कोथिंबीर करतात.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोथिंबीर पेरणीपूर्वी ते कोथिंबीरच्या बिया अर्थात धने तागाच्या गोणपाटात भिजवतात व तीन ते चार दिवसांनी लागवड करतात त्यामुळे बियांची उगवण चांगली होते.

नक्की वाचा:शेतकरी बनणार लखपती! हे पीक करणार मालामाल; जाणून घ्या सविस्तर...

 कीड व्यवस्थापनासाठी उपाय

 कोथिंबीर किडींच्या प्रतिबंधासाठी ते संबंधित उद्यान विभाग ज्या काही पद्धती सांगतो त्या पद्धतीचा वापर करतात.पावसाळ्यामध्ये ओलाव्यामुळे आणि अनेक प्रकारचा कीटकांचा प्रादुर्भाव कोथिंबिरीवर होतो. या किटकांचा प्रतिबंध करण्यासाठी क्लोरोपायरीफॉस नावाच्या औषधाची योग्य प्रमाणात द्रावण तयार करून त्याची फवारणी केली जाते.

पाऊस पडल्यानंतर ही कोथिंबीर बाजारात विक्रीसाठी तयार होते. जूनच्या सुरुवातीला या शेतकऱ्यांनी लागवड केलेली कोथिंबीर आता बाजारात आली असून ती चांगल्या दराने विकली देखील जात आहे.

येथील कृषी विभागाचे काही अधिकारी सांगतात की,या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लागवडीतून लाखोंचा नफा कमावला असून सद्यपरिस्थितीत केलेल्या कोथिंबीर लागवडीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळत आहे. एका हेक्‍टरमध्ये जवळ जवळ दहा क्विंटल हिरवी कोथिंबिरीचे उत्पादन शेतकरी घेत आहेत.

नक्की वाचा:Management: हिवाळ्यात भरघोस उत्पादन हवे असेल तर वापरा 'या' टिप्स,मिळेल आर्थिक नफा

English Summary: in hardoi district farmer take corriender production with technolody Published on: 04 August 2022, 03:04 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters