1. कृषीपीडिया

Management: हिवाळ्यात भरघोस उत्पादन हवे असेल तर वापरा 'या' टिप्स,मिळेल आर्थिक नफा

Crop Managent In Winter: आता पावसाळा सुरू असून अजून दोन महिन्यांनी हिवाळा ऋतुचे आगमन होईल. आपल्याला माहित आहेच की, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये पिकांवर देखील त्या हंगामाचा वेगवेगळ्या पद्धतीने विपरीत किंवा चांगला परिणाम होत असतो. यामध्ये आपण विपरीत परिणाम यांचा विचार केला तर यासाठी आपल्याला बर्याच प्रकारच्या उपाययोजना हंगामानुसार म्हणजेच त्या ऋतूमध्ये येणाऱ्या एकंदरीत वातावरण व परिस्थितीनुसार पिकांवर पडलेले रोग किंवा किडी त्याचे नियोजन करणे देखील तितकेच गरजेचे आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
this management tips is so important for more production in winter season

this management tips is so important for more production in winter season

Crop Managent In Winter: आता पावसाळा सुरू असून अजून दोन महिन्यांनी हिवाळा ऋतुचे आगमन होईल. आपल्याला माहित आहेच की, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये पिकांवर देखील त्या हंगामाचा वेगवेगळ्या पद्धतीने विपरीत किंवा चांगला परिणाम होत असतो. यामध्ये आपण विपरीत परिणाम यांचा विचार केला तर यासाठी आपल्याला बर्‍याच प्रकारच्या उपाययोजना हंगामानुसार म्हणजेच त्या ऋतूमध्ये येणाऱ्या एकंदरीत वातावरण व परिस्थितीनुसार पिकांवर पडलेले रोग किंवा किडी त्याचे नियोजन करणे देखील तितकेच गरजेचे आहे.

आता बहुतांशी हिवाळ्यामध्ये आपल्याला माहित आहेच की,वातावरणात थंडीचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे तापमान बऱ्याच प्रमाणात खाली घसरते व या वातावरणीय परिस्थितीचा पिकांवर विपरीत परिणाम होतो. या लेखात आपण हिवाळ्यामध्ये पिकांची काळजी घेण्याच्या काही खास गोष्टी जाणून घेऊ.

नक्की वाचा:मनातल्या प्रश्नाचे उत्तर! फवारणी करत आहात आणि पाऊस आला तर पुन्हा फवारणी करावी का? वाचा उत्तर

हिवाळ्यात पिकांची काळजी घ्यायच्या खास 'टिप्स'

 )थंडीमुळे पिकांवर होणारे दुष्परिणाम

1-अति थंडीमुळे पानांचा आकार कमी होतो तसेच पानांचा रंग निळसर व्हायला लागतो व झाड कोमेजल्या सारखे दिसते.

2- झाडांची श्वासोच्छवास क्रिया मंदावते.

3- झाडाच्या प्रकाशसंश्‍लेषण क्रिया देखील अडथळे निर्माण होऊन ही क्रिया देखील मंदावते.

4-वनस्पतीमधील पेशी गोठतात व त्यामुळे एकंदरीत पिकाच्या सर्वच भौतिक क्रियेत बदल होतो.

) या सर्व परिणामांवर उपाययोजना

1- जेव्हा दिवसा किंवा रात्रीच्या वेळेस सर्वात कमी तापमानाची नोंद असते त्या वेळेला प्लॉटला पाणी देणे खूप गरजेचे आहे त्यामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित होते. यामध्ये फ्लड पाणी दिल्यास उत्तम ठरते.

नक्की वाचा:Rain Damage Crop: काय सांगता! पावसामुळे शेतीचे होणारे नुकसान टळणार; फक्त 'या' पद्धतींचा वापर करा

2- हवेतील आद्रता त्याचा विपरीत परिणाम कमी करण्यासाठी झाडावर पाण्याचा फवारा घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे पिकाच्या पानांवरती पाणी मारल्यावर प्लॉटमधील आद्रतेमुळे वातावरणातील तापमानापेक्षा किमान दोन अंश सेंटिग्रेडने प्लॉटमधील तापमान वाढते.

3- एमिनो एसिड युक्त औषधांचे बोरॉनमध्ये मिसळून फवारणी घेणे फायद्याचे ठरते.

4- तसेच ड्रीपच्या माध्यमातून नत्रयुक्त खताचा पुरवठा पिकांना करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे पिकांची चयापचय क्रिया वाढण्यास मदत होते.

5- तुमच्या पिकाच्या प्लॉटची सद्य परिस्थिती पाहून कॅल्शियम नायट्रेटचा ड्रिप मधून डोस देणे महत्त्वाचे ठरते. यामुळे पेशी विभाजन होण्यास मदत होते.

6- त्यासोबतच सल्फरचा वापर स्प्रे मधून व ड्रीप अनेक करणे गरजेचे असते, त्यामुळे पिकाच्या मुळी गरम राहतात व क्रियाशील राहतात.

7- जर शक्य असेल तर फळ बागेमध्ये ठिकठिकाणी शेकोट्या करणे व तापमान नियंत्रित ठेवणे गरजेचे असते.

नक्की वाचा:केळी उत्पादकांनो सावधान! बंची टॉप विषाणूचा होतोय प्रादुर्भाव; करा हा उपाय अन्यथा होईल मोठे नुकसान

English Summary: this management tips is so important for more production in winter season Published on: 04 August 2022, 01:00 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters