1. यशोगाथा

शेती करावी तर अशी; पठ्याने घेतले दीड एकरात 10 क्विंटल तीळाचे उत्पादन

सध्यपरिस्थितीला तिळाला दहा ते पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे. शिवाय हे पीक हिवाळा, उन्हाळ्याच्याही हंगामात घेता येते. औषध, फवारणीचा खर्च नाही, कोणताही रोग येत नाही, आला तरी जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना तिळाचे पिक परवडेल असे आहे.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
भारतातील शेतकरी बांधव शेती व्यवसायात नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेतीतील पिकांचा दर्जा वाढवत आहेत.

भारतातील शेतकरी बांधव शेती व्यवसायात नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेतीतील पिकांचा दर्जा वाढवत आहेत.

भारतातील शेतकरी बांधव शेती व्यवसायात नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेतीतील पिकांचा दर्जा वाढवत आहेत. पारंपरिक शेतीबरोबर अत्याधुनिक शेतीची सांगड घातल्यामुळे शेतकरी वर्गाला चांगला नफा देखील मिळत आहे. पीक पद्धतीत बदल हा प्रयोग बरेच शेतकरी करत आहेत. असाच एक प्रयोग नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने केला आहे. या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नायगाव तालुक्यातील इकळी मोरे येथील अल्पभूधारक शेतकरी गणपत दिगंबर मोरे यांनी उन्हाळी हंगामात दीड एकरात तिळाचे जवळजवळ दहा क्विंटलचे उत्पादन घेतले आहे. दिगंबर मोरे यांची तीन एकर शेती आहे. त्यांनी नांदेड जिल्ह्यातील बारड येथील नातेवाईक शेतकऱ्याचा पीक बदलाचा प्रयोग पाहिला. आणि त्यांचे मार्गदर्शन घेऊन गेले तीन वर्षे तिळाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली.

गणपत मोरे यांनी वर्षभरात प्रामुख्याने तीन पिके घेतली. आणि यातून त्यांना भरघोस उत्पादनदेखील मिळाले. त्यामुळे पीक बदलाचा हा प्रयोग नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शेतकरी गणपत दिगंबर मोरे यांची तीन एकर शेती आहे व ती बागायती आहे. वर्षभरात ते सोयाबीन, हरभरा आणि तिळाचे पिक प्रामुख्याने घेतात. हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन, त्यानंतर हरभरा आणि उन्हाळी म्हणून तिळाचे पिक घेतात.

या तीळ पीक लागवडीसाठी एकरी दोन किलो बियाणे, एक पोते खतासह त्यांना एकूण दोन हजार रुपये खर्च आला. तर एक दोन वेळा पाणी दिल्यानंतर निदणी आणि खुरपणी केली जाते. विशेषतः तीळ या पिकास जनावरे, डुकरे खात नाहीत शिवाय फवारणीचा खर्च देखील वाचतो. या पिकाचा उत्पादन कालावधी तीन महिन्याचा आहे. यात एकरी सरासरी सहा क्विंटल इतके उत्पादन होते.

सध्यपरिस्थितीला तिळाला दहा ते पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे. शिवाय हे पीक हिवाळा, उन्हाळ्याच्याही हंगामात घेता येते. औषध, फवारणीचा खर्च नाही, कोणताही रोग येत नाही, आला तरी जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना तिळाचे पिक परवडेल असे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किमान उन्हाळ्यात तिळाचे पिक घेऊन भरघोस उत्पादन मिळवावे असे गणपत मोरे यांनी सांगितले.

मत्त्वाच्या बातम्या:
आता उजनीचे पाणी होणार लाल? पाणी वाटपावरून मोठा राडा
ठाकरे सरकारची मोठी घोषणा..! आता प्रत्येक कुटुंबात शेळ्यांचे वाटप
मोदींचा एक निर्णय आणि जगात मोठी खळबळ, आंतरराष्ट्रीय बाजारात घडणार मोठ्या घडामोडी...

English Summary: If farming is to be done; Production of 10 quintals of sesame seeds in one and half acre Published on: 17 May 2022, 05:08 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters