1. यशोगाथा

कोरोना काळात नांदेड मधील शेतकऱ्याने नारळाच्या बागेतून कमावले लाखो रुपये

नारळाची शेती म्हणले की आपणास कोकण आठवतो परंतु नांदेड मध्ये ही शेती म्हणल्यावर एक नवल च वाटेल जे की नांदेड जिल्ह्यातील डोंगरकडा येथील त्र्यंबक कुलकर्णी या शेतकऱ्याने ही किमया केलेली आहे.नांदेड मधील डोंगरकडा येथील त्र्यंबक कुलकर्णी हे एक इंजिनिअर तर आहेतच त्याच बरोबर एक प्रगतशील शेतकरी सुद्धा.

किरण भेकणे
किरण भेकणे
coconut

coconut

नारळाची(coconut) शेती म्हणले की आपणास कोकण आठवतो परंतु नांदेड मध्ये ही शेती म्हणल्यावर एक नवल च वाटेल जे की नांदेड जिल्ह्यातील  डोंगरकडा  येथील त्र्यंबक कुलकर्णी या शेतकऱ्याने ही किमया केलेली आहे.नांदेड मधील डोंगरकडा येथील त्र्यंबक कुलकर्णी हे एक इंजिनिअर तर आहेतच त्याच  बरोबर  एक प्रगतशील शेतकरी सुद्धा.

आधी शेती मधून उत्पादन कमी यायचे:

कुलकर्णी यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नारळाच्या बागेची शेती केली आहे जसे की त्यांनी कोरोनाच्या काळात त्या उत्पादनातून आपल्या कुटुंबियांची प्रगती साधलेली आहे. त्यांनी आपल्या ५० एकर पैकी ७ एकर मध्ये नारळाची बाग लावली आहे.कुलकर्णी यांनी सुरुवातीस शेतीमध्ये ऊस, केळी  तसेच  कापूस  या पिकांचे उत्पादन घेत होते मात्र मराठवाडा मध्ये बदलते हवामान आणि तापमान मुळे त्यांना त्यामधून फारसे उत्पादन भेटत नव्हते .तर कधी  कधी  शेती  मधून उत्पादन कमी यायचे आणि त्यासाठी लागणारी खते, बियाणे तशीच वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांना च जास्त पैसे खर्च होयचे यामधून त्यांनी एक पर्याय काढत त्यांनी गोवा राज्यातील नारळाची पाहणी केली आणि आपल्या शेतीत नारळ बाग लावायची ठरवले.

हेही वाचा:नोकरी सोडून आपला कल ओळवला शेतीकडे,आता वर्षाकाठी घेतात १५ लाख रुपयांचे उत्पादन

.इसापूर तसेच एलदरी धरणातील पाण्यामुळे अर्धापुर मधील बरेच शेतकरी आपल्या  शेतीमध्ये केळीची बाग लावतात  परंतु  कुलकर्णी  यांनी   मराठवाड्यात पहिलाच वेळी नारळाची बाग फुलवली आहे.एवढंच नाही तर त्यामधून चांगल्या प्रकारे उत्पादन सुद्धा घेतले आहे. कुलकर्णी  यांनी गोवा  मधून  नारळाची रोपे आणली आणि त्यासाठी त्यांनी २५ बाय २५ फुटावर सुमारे ७ एकर शेतीमध्ये ५०० रोपे लावली. त्यांना योग्य खते देऊन जोपासना केली तसेच योग्य  वेळी पाणी देणे म्हणजेच कमी पाण्यात बाग वाढवली आणि लावल्यापासून तिसऱ्या वर्षी त्यांना त्यामधून उत्पादन भेटायला सुरू झाले.कुलकर्णी यांच्या बागेला अत्ता ७ वर्ष पूर्ण झाले आहेत.

त्यामधून त्यांना प्रति एकर ३ लाख ५० हजार  रुपये भेटतात  म्हणजेच ७ एकर ला  त्यांना वर्षाला २५ लाख रुपये भेटतात.कोरोना काळात सगळ्यांचे व्यवसाय ठप्प झाले मात्र कुलकर्णी याना त्यांच्या  बागेने  दिलासा दिला. ते फक्त नारळ पासून च नाही तर  नारळाच्या फुलांपासून  ते कल्परस, आईस्क्रीम सुद्धा तयार करतात यामधूनही त्यांना चांगले  उत्पादन  भेटते.नारळ हे फळ नास होत नाही त्याचे प्रमाण  खूप कमी आहे त्यामुळे ते इतर  फळाच्या बाबतीत जास्त दिवस टिकते. कुलकर्णी यांनी कोणत्याही  बाजार पेठेत जाऊन नारळ विकले नाहीत तर  स्वतः व्यापारी  त्यांच्या शेतीमधून नारळ घेऊन जायचे. कोरोना काळामध्ये त्यांना नारळाच्या बागेने खुप साथ दिली.

English Summary: During the Corona period, a farmer in Nanded earned millions of rupees from a coconut orchard Published on: 13 August 2021, 06:18 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters