Farmer success story : ग्रामीण तसेच देशाच्या आर्थिक बाबतीत अनन्यसाधारण महत्व असणार क्षेत्र म्हणजे शेती. तसं बघायला गेलं तर शेती क्षेत्र जोखमीचं क्षेत्र आहे असं म्हणायला हरकत नाही. या व्यवसायात समर्पण, अमाप कष्ट, पूर्वनियोजन यांची जोड असावी लागते. एवढं जरी केलं तरी आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्याची क्षमता ठेवावी लागते. त्यामुळे बऱ्याचदा 'शेती व्यवसाय नको रे बाबा' असेही उद्दगार काढले जातात.
मात्र अत्याधुनिक शेती पद्धत आणि नवनवीन तंत्रज्ञानमुळे तरुणांची शेती व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तरुणाई वर्ग आपल्या कठोर परिश्रमाने आणि समर्पणाने पारंपारिक पद्धतींपेक्षा काहीतरी जरा हटके करत आहेत. सध्या तरुणाई शेतीशी संबंधित शेती पुरक व्यवसायात अग्रेसर आहेत. त्यातून चांगला नफा मिळवत ते आपले नशीब आजमावत आहेत. शेती आणि शेतीशी संबंधित शेती पुरक व्यवसायात असंख्य मार्ग असून यामध्ये मोठी कमाई करण्याचे अनेकानेक संधी आहेत.
आणि त्यातून आपल्या स्वकष्टाच्या जोरावर इतरांसाठी प्रेरणास्त्रोत बनत आहेत. सध्या नरेंद्र कुमार नामक व्यक्ती सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत बनले आहेत. मित्रांनो नरेंद्र कुमार हे पेशाने चार्टर्ड अकाउंटंट (CA) आहेत. मात्र ते आता पशुपालन व्यवसाय करून चांगला नफा कमावत आहेत. नरेंद्र हे मूळचे बिहार येथील रहिवासी आहेत, मात्र गेल्या काही वर्षांपासून नोएडामध्ये वास्तव्यास आहेत. आणि येथे राहून दुग्धव्यवसाय करत आहेत.
ते केवळ पशुपालन व्यवसाय करून थांबले नाहीत तर, जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याचे उत्पादन देखील ते स्वःताच घेतात. चाऱ्याचे उत्पादन देखील ते हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने घेत आहेत. विशेष म्हणजे नरेंद्र कुमार हे देशी गायींच्या संवर्धनावरही काम करत आहेत. CA नरेंद्र कुमार हे मूळचे बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील रुनी-सैदपूर तहसीलचे रहिवाशी असून सध्या नोएडामध्ये वास्तव्यास आहे. व त्यांची कंपनी चालवत आहेत.
मित्रांनो नरेंद्र CA चे यशस्वी व्यावसायिक जीवन जगत होते. मात्र असा एक प्रसंग घडला आणि त्यांनी शेती व्यवसायात पाऊल टाकलं. तो प्रसंग म्हणजे
कोरोनाच्या काळात नरेंद्र कुमार यांना शुद्ध देसी तूप आणि दूध मिळतं नव्हते. यामुळे त्यांनी विचार केला की, आपण स्वतःच काही तरी करावे म्हणजे देशी तूप आणि दुधासाठी भटकंती करावी लागणार नाही. आणि निर्णय पक्का करून त्यांनी स्वतःसाठी देशी गायीचे संवर्धन केले.
अशा पद्धतीने त्यांनी पशुपालन व्यवसायाला सुरुवात केली. आणि लवकरच त्यांच्या फार्ममध्ये गायींची संख्या वाढत गेली. आज नरेंद्र कुमार यांच्याकडे गीर आणि साहिवाल या जातीच्या अनेक गायी आहेत. उत्पादन वाढल्यावर त्यांनी दूध, तूप, दही विकायला सुरुवात केली. देशी गायींच्या उत्पादनांना शहरापासून ते खेड्यापाड्यांपर्यंत मोठी मागणी आहे आणि लोक त्यासाठी चांगली किंमतही देतात.
वादळी वाऱ्याचे थैमान; प्रसंगावधानामुळे बचावला तरुण
नरेंद्र कुमार आज नोएडा-एनसीआरच्या अनेक भागात दूध, दही आणि तूप विकत आहेत. नरेंद्र सांगतात की, देशी गाय कमी दूध देते, पण दुध हे गुणवत्तापूर्ण असते. गुणवत्तेला धक्का न लावता देशी गायींची दूध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आम्ही कार्य करत आहोत. यासोबतच देशी जातीचे चांगले नंदीही तयार केले जात आहेत.
शुद्ध आणि देशी गाईचे दूध आणि त्याची उत्पादने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हेच नरेंद्र कुमार यांचं उद्दिष्ट आहे. निश्चितच नरेंद्र यांनी शेतीपूरक व्यवसायात साधलेली प्रगती उल्लेखनीय आहे.
महत्वाच्या बातम्या:
खतासंबंधी महत्वाची बातमी! DAP ला मिळाला PROM चा पर्याय, वाचा सविस्तर माहिती
क्षणात होत्याच नव्हतं झालं; 54 शेळ्यांचा एकापाठोपाठ मृत्यू
Share your comments