1. बातम्या

खतासंबंधी महत्वाची बातमी! DAP ला मिळाला PROM चा पर्याय, वाचा सविस्तर माहिती

पीक वाढीसाठी रासायनिक खतांची नितांत आवश्यकता असते.परंतु बऱ्याचदा ऐन पिकांना खताची आवश्यकता असते तेव्हाच खतांची टंचाई असते किंवाआवश्यक असणारे खत वेळेवर मिळत नाही.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
making promo fertilizer in hariyana that can good option to dap

making promo fertilizer in hariyana that can good option to dap

पीक वाढीसाठी रासायनिक खतांची नितांत आवश्यकता असते.परंतु बऱ्याचदा ऐन पिकांना खताची आवश्‍यकता असते तेव्हाच खतांची टंचाई असते किंवाआवश्यक असणारे खत वेळेवर मिळत नाही.

शेतकऱ्यांमध्ये बऱ्याचदा एखादे खत जास्त प्रमाणात वापरण्याचा ट्रेंड दिसून येतो. आपल्याला माहित आहेच कि खतांमध्ये युरिया आणि डीएपी या खताचा मोठ्या प्रमाणात शेतकरी वापर करतात. त्यामुळे अशा खताची वेळेवर टंचाई निर्माण होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे आता DAP या खताला PROM या खताचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याबद्दल आपल्या लेखात आपण माहिती घेऊ.

DAP ला PROM खताचा पर्याय

 पिंजोर, हिस्सार आणि भिवानी येथील गोशाळा मध्ये डीएपी या खताला पर्याय तयार केला जात आहे. प्रोम फर्टीलायझर, हरियाणा कृषी विद्यापीठ, उद्यान विभाग आणि कृषी विभाग एकत्रपणे याच्या चाचणी घेतील. हरियाणा राज्य हे शेतीत खूप पुढे असून ते याच्यावर एक पर्याय शोधत आहेत. शेना पासून तयार केलेले फॉस्फेट रिच ऑर्गेनिक खत अर्थात PROM हे खत डीएपी खताला पर्याय ठरू शकते, असे कृषिमंत्री जेपी दलाल यांनी म्हटले आहे. या खताची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, गौ सेवा आयोग, उद्यान विभाग आणि हरियाणा कृषी विद्यापीठ इत्यादींच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

हरियाणा राज्याचा विचार केला तर या रब्बी हंगामामध्ये येथील शेतकऱ्यांना डीएपी या खताचा टंचाईचा खूप सामना करावा लागला होता. अशा वेळी तेथील शेतकऱ्यांनी सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरियाचा वापर केला  होता. आता खरीप हंगाम तोंडावर आला असून डीएपी ला पर्याय म्हणून कृषिमंत्री प्रॉम ची चर्चा करत आहेत. परंतु रासायनिक खतांच्या तुलनेमध्ये या सेंद्रिय खतात शेतकरी रस घेतात की नाही हा येणारा काळच ठरवेल.

 या ठिकाणी तयार होत आहे प्रॉम

 यासंबंधीची माहिती देताना कृषिमंत्री जेपी दलाल यांनी सांगितले की, पिंजोर, हिस्सार आणि भिवानी येथील गो शाळांमध्ये हे खत तयार केले जात असून या खताचे निरीक्षण आणि चाचणी आयआयटी एचएयुच्या प्रयोगशाळेत करण्यात आली आहे. ते म्हणाले की हरियाणा कृषी विद्यापीठ, उद्यान विभाग आणि कृषी विभागाचे लोक या खताच्या चाचण्या घेणार आहेत. कारण ते देशासाठी एक क्रांतिकारी पाऊल असल्यामुळे PROM खताची यशस्वी चाचणी झाल्यास ते देशाच्या हिताच्या दृष्टीने मोठे पाऊल ठरेल असा दावा त्यांनी केला.

पुढे बोलताना कृषिमंत्री दलाल म्हणाले की, prom खताच्या बाबतीत एक टास्क फोर्स तयार करण्यात आले असून यामध्ये कृषी विभाग, गौ सेवा आयोग आणि हरियाणा कृषी विद्यापीठाचे अधिकारी समाविष्ट आहेत. हि टीम या प्रॉम कंपोस्ट बद्दल आपला अहवाल देईल.(स्रोत-किसानराज)

आपल्याला प्रोम हे खत हवे असल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा - गोपाल उगले

मो - 9503537577

  महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Post Office Scheme : 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा; जोखीमविना मिळणार मोठा फायदा

नक्की वाचा:माझ्यासोबत डीपी का ठेवत नाही म्हणून बायको भांडते तरुणाची तक्रार, पुणे पोलीस आयुक्तांचा हटके सल्ला, “नेहमी…”

नक्की वाचा:Farming Business Idea: 'हा' शेतीपूरक व्यवसाय सुरु करा आणि महिन्याकाठी कमवा एक लाख; वाचा सविस्तर

English Summary: making promo fertilizer in hariyana that can good option to dap Published on: 11 May 2022, 04:38 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters