शेती व्यवसायात (Farming Business) काळाच्या ओघात बदल केला तर कमी जमिनीतून हे अधिक उत्पादन सहज प्राप्त करता येते. यासाठी मात्र योग्य नियोजनाची सांगड घालणं हे महत्त्वाचे ठरते. अकोला जिल्ह्यातील (Akola) एका शेतकऱ्याने (Farmers) देखील पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत ब्रोकोली (Brocoli Farming) या विदेशी भाजीची लागवड करून कमी शेतजमिनीत चांगले बक्कळ उत्पन्न प्राप्त केले आहे.
जिल्ह्यातील मौजे गौळखेडा येथील गजानन वानखेडे नामक एका अवलिया शेतकऱ्याने आपल्या दहा गुंठे शेतजमीनत काहीतरी हटके करायचे या विचाराने ब्रोकोली या विदेशी भाजीची लागवड (Brocoli Cultivation) केली. या दहा गुंठे क्षेत्रातून गजानन यांना तब्बल दोन लाख रुपये उत्पन्न मिळण्याची आशा आहे. निश्चितच गजानन यांनी केलेला हा बदल त्यांच्यासाठी जणूकाही वरदानच सिद्ध झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातमी कामाची! या फळाची शेती करा आणि कमवा चार लाखांचा नफा; वाचा सविस्तर
Mansoon 2022: मान्सून लवकर येण्याच्या बातम्या फसव्या; हवामान तज्ञानेचं केला खुलासा
मित्रांनो खरे पाहता उन्हाळ्यात भाजीपाला वर्गीय पिकांची शेती करणे म्हणजे एक आव्हानच आहे. आणि विदर्भ सारख्या गरम प्रदेशात उन्हाळी हंगामात यशस्वीरित्या भाजीपाल्याचे उत्पादन घेणे म्हणजे चमत्कारच म्हणावा लागेल. हा चमत्कारच गजानन यांनी करून दाखवला आहे.
उन्हाळी हंगामात गजानन यांनी आपल्या 10 गुंठे क्षेत्रावर कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या सल्ल्याने ब्रोकोली या विदेशी भाजीची लागवड केली. विशेष म्हणजे यासाठी गजानन यांनी आधुनिक पद्धतीचा वापर केला. गजानन यांनी आपल्या 10 गुंठे क्षेत्रात शेडनेटची उभारणी केली आणि मल्चिंग पेपरचा वापर करून ब्रोकोली या भाजीची लागवड केली.
या ब्रोकोली पिकासाठी आवश्यक खतांच्या मात्रा तसेच पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा सल्ला लाभत आहे. गजानन यांना ब्रोकोली शेती विषयक माहिती रुद्रायणी ऍग्रो इंडिया विदर्भ कडून मिळत आहे. भाजीपाला वर्गीय पिकांची अनेकदा कवडीमोल दरात विक्री करावी लागते मात्र रुद्रायणी ऍग्रो इंडिया यांनी बाजार भावाबाबत हमी घेतली आहे. रुद्रायणी अग्रो इंडिया शेतकऱ्यांनी पाठवलेला माल स्वतः विकत असते.
यामुळे गजानन यांच्या ब्रोकोलीला शंभर रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. या यशामुळे गदगद झालेले गजानन पावसाळी हंगामात एक एकर क्षेत्रात ब्रोकोलीची लागवड करणार आहेत. निश्चितच गजानन यांना मिळालेले हे यश इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारे आहे.
Share your comments