1. यशोगाथा

भावा फक्त तुझीच हवा!! मुंबईचा उद्योजक गावी परतला अन शेती सुरु केली; आज कमवतोय वर्षाकाठी 20 लाख

मायानगरी अर्थात मुंबईमध्ये स्वतःचा कपड्यांचा व्यवसाय. या स्वप्नांच्या शहरात लाखोंची उलाढाल. सर्वात महत्वाचे म्हणजे चैनीचे आणि सुख समृद्धीने नटलेले जीवन. हे सर्व सोडून दहावी पास युवकाने 9 वर्षांपूर्वी गावात शेती करण्यास सुरुवात केली. असं सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे शंभर टक्के खरे आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Cucumber Farming makes farmer millionaire

Cucumber Farming makes farmer millionaire

मायानगरी अर्थात मुंबईमध्ये स्वतःचा कपड्यांचा व्यवसाय. या स्वप्नांच्या शहरात लाखोंची उलाढाल. सर्वात महत्वाचे म्हणजे चैनीचे आणि सुख समृद्धीने नटलेले जीवन. हे सर्व सोडून दहावी पास युवकाने 9 वर्षांपूर्वी गावात शेती करण्यास सुरुवात केली. असं सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे शंभर टक्के खरे आहे.

गावी परतल्यानंतर शेतीत अनेक नवे प्रयोग करून पाहिले, पण यश आले नाही. त्यानंतर त्यांना पालीमध्ये फळांच्या आणि भाजीपाल्याच्या बागांची कल्पना सुचली. मात्र या कल्पनेने त्यांचे संपूर्ण आयुष्यचं बदलले. जालोरच्या तडवा येथील रहिवासी मदनसिंग सोलंकी यांची ही गोष्ट आहे.

2014 मध्ये त्यांनी मुंबईतील कपड्यांचा रुबाबात थाटलेला व्यवसाय सोडून शेती सुरू केली. पहिल्या पाच वर्षांत शेतीत वारंवार अपयशाचा सामना करावा लागला, पण यामुळे सोलंकी निराश झाले नाहीत, खचले नाहीत तर दुप्पट आवेशाने त्यांनी शेतीत काहीतरी हटके आणि जगावेगळ नवीन करायला सुरुवात केली.

सोळंकी यांनी 2019 मध्ये शेतात दोन पॉली हाऊस उभारून भाजीपाला लागवडीला सुरुवात केली. आज मदन सिंग केवळ काकडीच्या शेतीतुन वर्षाला 20 लाख रुपयांहून अधिक कमावतात. फार्म हाऊसवरच कांकरेज आणि गीर गायी आहेत. त्यांचे तूप गुजरातपर्यंत पुरवले जाते. 

अलीकडेच त्यांनी डाळिंब आणि पपईच्या बागा तयार केल्या आहेत. पुढील हंगामात ते त्याची काढणीही करतील. टर्कीच्या बियाण्यांसह काकडीची लागवड सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

आता त्यांची काकडी जालोर मंडीत एक ब्रँड बनली आहे. येत्या काही महिन्यांत पपई आणि डाळिंबाचे पहिले पीक घेऊन 16 लाख कमाईचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बांगलादेशात डाळिंब निर्यात करण्याची योजना आहे.

दोन हजार चौरस मीटरचे दोन पॉली हाऊस

मदनसिंग सोळंकी यांच्या शेतात सध्या 2-2 हजार चौरस मीटरचे 2 पॉली हाऊस आहेत. त्यात काकडीचे चांगले उत्पादन घेत आहे. एका पॉली हाऊसमध्ये 4 हजार काकडीचे रोपे आहेत. ते वर्षातून दोनदा तयार केले जातात. सामान्य दिवशी ते 20 रुपये किलोने विकले जाते. हंगामात 40 रुपये किलोने काकडीला दर मिळतं असल्याचे ते नमूद करतात.

पाणी बचतीकडे विशेष लक्ष द्यावे

मदनसिंह सोळंकी यांच्या शेतात कूपनलिका आहे. पॉली हाऊसमध्ये सिंचनासाठी ठिबक यंत्रणा बसवली आहे. त्याचबरोबर शेतातील इतर पिकांमध्ये पाण्याची बचत लक्षात घेऊन कारंज्याचे तंत्र वापरले जात आहे. त्यांचे कुटुंब शेतीशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले, त्यामुळे ही कल्पना आली. सध्या 10 जणांची टीम त्याचे काम पाहत आहे. निश्चितचं मदन सिंग यांनी केलेला हा शेतीतला बदल इतरांसाठी प्रेरणा देणारा आहे.

English Summary: Brother, I want only you !! Mumbai businessman returns to village and starts farming; Today, he earns Rs 20 lakh a year Published on: 13 May 2022, 09:29 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters