1. कृषीपीडिया

Farming Business Idea: या फळाला आहे मोठी मागणी; लागवड करा आणि कमवा वार्षिक 10 लाख

मित्रांनो सध्या आपल्या देशातील शेतकरी बांधव फळबाग लागवडीकडे विशेष वळले आहेत. याचा शेतकऱ्यांना फायदा देखील होत आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात (Farmers Income) भरीव वाढ झाली आहे. फळबाग शेतीचे हेच महत्व ओळखता आज आपण फणस या फळाच्या शेती विषयी (Jackfruit Farming) माहिती जाणुन घेणार आहोत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
jackfruit farming

jackfruit farming

मित्रांनो सध्या आपल्या देशातील शेतकरी बांधव फळबाग लागवडीकडे विशेष वळले आहेत. याचा शेतकऱ्यांना फायदा देखील होत आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात (Farmers Income) भरीव वाढ झाली आहे. फळबाग शेतीचे हेच महत्व ओळखता आज आपण फणस या फळाच्या शेती विषयी (Jackfruit Farming) माहिती जाणुन घेणार आहोत.

खरं पाहता जगातील सर्वात मोठ्या फळांमध्ये जॅकफ्रूट म्हणजेच फणसची (Jackfruit) गणना केली जाते. लोक सहसा भाज्या, लोणचे इत्यादी बनवण्यासाठी फणसाचा वापर करतात. अशा स्थितीत बाजारात (Market) फणस या फळाला मोठी मागणी असते शिवाय फणसाचे दरही (Jackfruit Rate) चांगलेच राहतात.

ऐकावे ते नवलंच! एकाच झाडाला लागणार टोमॅटो आणि बटाटे; वाचा या नवीन टेक्निकविषयी

या शेतीचे सर्वात मोठी विशेषता म्हणजे याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. कोणत्याही विशेष देखरेखीशिवाय हे पीक घेतले जाऊ शकते. ही फळे 8-10 महिन्यांत बंडिंग/ग्राफ्टिंगसाठी तयार होतात. एकदा पीक लावले की, शेतकऱ्यांना या रोपातून अनेक वर्षे नफा मिळू शकतो.

याला म्हणतात यश! शेतीत केला एक बदल अन आता वर्षाला कमवतोय 10 करोड; जाणुन घ्या हा भन्नाट प्रयोग

फणसाच्या लागवडीसाठी अनुकूल हवामान

कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, फणस लागवडीसाठी कोरडे हवामान सर्वात योग्य असते. कोरड्या हवामानात फणस लागवड केल्यास यापासून चांगले उत्पादन मिळतं असल्याचा दावा केला जातो. फणस लागवड करण्यासाठी आपल्या राज्याचे हवामान अनुकूल मानले जाते, हे कुठेही वाढू शकते. या फळाची लागवड डोंगर, पठार अशा ठिकाणीही करता येते. थोडी काळजी घेतल्यास, ही वनस्पती शेतकऱ्यांना काही वेळातच चांगला पैसा कमवून देऊ शकते.

फणस शेतीसाठी पाणी व्यवस्थापन 

 

फणसाच्या शेतीसाठी पाणी आवश्यक आहे. फणस लागवड केल्याच्या सुरुवातीपासूनच रोपांना पाणी देणे आवश्यक असते. तज्ज्ञांच्या मते, या फळाला उन्हाळा आणि हिवाळ्यात दर 15 दिवसांच्या अंतराने पाणी लागते.

Weather Forecast: कसं असेल आज महाराष्ट्राचं हवामान; वाचा सविस्तर

मित्रांनो भाजीसाठी वापरल्या जाणार्‍या मध्यमवयीन फळांची देठ गडद हिरव्या रंगाची, लगदा कडक आणि गाभा मऊ असताना काढणी करावी. याशिवाय, जर तुम्हाला फणसाच्या पिकलेल्या फळांचे उत्पादन घ्यायचे असेल तर ते फळ लागल्यानंतर सुमारे 100-120 दिवसांनी तोडले पाहिजे.  आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जर फणसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली तर शेतकऱ्यांना वर्षाला 8 ते 10 लाखांचा नफा सहज मिळू शकतो.

English Summary: Farming Business Idea: This fruit is in great demand; Plant and earn 10 lakhs annually Published on: 13 May 2022, 06:15 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters