शेतीमध्ये सध्या अनेक बदल होत चालले आहेत, सध्या आधुनिक शेतीला महत्व दिले जात आहे. यामुळे याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. असे असताना सोशल मीडियावर अनेक फोटो सध्या शेतीचे व्हायरल होत आहेत. यामुळे शेतीमध्ये किती क्रांती होत आहे, हे दिसून येते. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका शेतकऱ्याने याच लाल केळीची शेती करत अवघ्या 60 झाडातून वर्षाला 2 लाखांचे उत्पन काढले आहे. विशेष म्हणजे ही एक केळ 30 रुपयाला मिळते.
यामुळे या शेतकऱ्याची चर्चा सुरु आहे. या केळीला मोठी मागणी आहे, याचे कारण म्हणजे ही केळी आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्वाची आहे. लाल केळी नियमित खाल्ल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढण्यासाठी सुद्धा मदत होते. तसेच लाल केळी डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून, त्यात पोटॅशिअम असल्याने हाडे बळकट होतात. यामुळे याची मागणी वाढते.
तसेच लाल केळी खाल्ल्याने हेमोग्लोबिन वाढण्यास फायदा होतो आणि त्यात ट्रायटोफन असल्याने मन शांत राहते. आपण अनेक आजारांवर लाल केळी खाल्ल्याने मात करू शकतो. त्यामुळे बाजारात लाल केळीला मागणी आहे. 300 रुपये प्रतिकिलो विकणार लाल केळ 30 रुपयाला एक मिळते. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात.
लॉकडाऊनबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य, कोरोना रुग्णसंख्या वाढली
उत्पन अल्पप्रमाणात असल्याने ग्राहक आधीपासूनच बुकिंग करून ठेवतात. तसेच अनेक व्यापारी देखील याची बुकिंग करून ठेवतात. कन्नड तालुक्यातील अजय जाधव या प्रगतीशील शेतकऱ्याने अडीच गुंठ्यात 500 केळीची झाडे लावली आहे. यात 60 झाडं लाल केळीची आहे. 10 वर्षांपूर्वी त्यांनी ही झाडे लावली होती.
आता ड्रोनच्या सहाय्याने होणार सामानाची डिलेव्हरी, देशातील पहिला प्रयोग यशस्वी
एका झाडाला सरासरी 15 किलोचा घड लागतो आणि ही केळ 300 रुपये प्रती किलो विकली जाते. त्यामुळे जाधव यांना लाल केळीच्या 60 झाडातून सरासरी वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांचे होते. यामुळे त्यांना चांगले उप्तन्न मिळते. यामुळे त्यांचा हा आगळा वेगळा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या केळीला फक्त वर्षातून तीन वेळा पाणी द्यावे लागते. कारण झाडांना आम्ही सक्षम केलं आहे, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या;
नितेश राणेंची मोठी घोषणा! बैलगाडा शर्यतीतील विजेत्याला देणार मर्सिडिज गाडी बक्षीस
मोठी बातमी!! भारतामध्ये लवकरच येणार लोकसंख्या नियंत्रण कायदा, मोदी सरकार घेणार मोठा निर्णय
'बैल कधी एकटा येत नाही, सोबत नांगर घेऊन येतो'
Share your comments