1. यशकथा

बारावी पास शेतकऱ्याची कमाल, एका एकरात कमावले १५ लाख रुपये

सोमेश्वर श्रीधर लवांडे

सोमेश्वर श्रीधर लवांडे

कोरोना'तील लाॅकडाउन अनेकांना आर्थिक अडचणीचा ठरला. मात्र, फत्तेपूर (ता.नेवासे) येथील अल्पभूधारक तरूण शेतकऱ्याने जिद्द आणि कष्टाच्या जोरावर एक एकर शेतीत देशी, परदेशी चारा पीकाच्या माध्यमातून बक्कळ नफा कमावला. अर्थात त्यांनी कठोर परिश्रम करत शेती व्यवसायात त्यांनी यश मिळवलं आहे.

अवघे बारावीचे शिक्षण घेतलेल्या शेतकऱ्याचे शेतीतील व्यवस्थापनशास्त्र वाखाणण्याजोगे आहे. त्या व्यवस्थापनाच्या शेतीतून कमावलेले नफा पाहून आयटी कंपन्यांतील तगड्या पॅकेजवाल्यांचेही डोळे पांढरे होतील. या शेतकऱ्याचे यश पाहून सोशल मीडियावर शेती करावी तर अशी...या आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे. या शेतकऱ्याचे नाव आहे, सोमेश्वर श्रीधर लवांडे. लवांडे हे फत्तेपूर (ता.नेवासे) येथे राहतात.

दरम्यान, शेतीची आधी सोमेश्वर श्रीधर लवांडे हे सुरुवातीला शनिशिंगणापूर येथे व्यावसाय केला. एका कंपनीत काही वर्ष कामही केले. मात्र, त्याचे दोन्ही ठिकाणी मन लागेना. पत्नी रेणुकासह त्याने आहे त्या एक एकर शेतीत काळ्या आईची सेवा करण्याचा निर्णय घेतला. शेती 'हटके' करण्याचा ध्यास घेवून शेतात वेगळा प्रयोग करण्याच्या हेतूने चारा पीकाची निवड केली.

 

दुधासाठी सकस चारा

सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध सुरू केला. नवनवीन पिकांचा शोध घेताना थायलंडमधील विकसित फोर जी बुलेट सुपर नेपियर या चारा पिकांची माहिती मिळाली. हेच पीक आपल्याकडील पारंपरिक गिनी आणि इतर चारा पिकांना फाटा देईल. हे लक्षात घेवून त्यांनी लागवड केली. कमी वेळेत अधिक उत्पादन आणि दूधासाठी सकस असलेला हा चारा दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या पसंतीस उतरला आहे. पुढे त्यांनी इंडोनेशिया, बांगलादेश, ऑस्ट्रेलियातील चारा वाणांची लागवड केली.

स्वतःच केले वाण विकसित

लवांडे यांनी विकसित केलेल्या यशस्वी बियाण्यास फोर-जी बुलेट व इंडोनेशियाचा बाहुबली असे नाव देण्यात आले. चारा बियाणे बरोबरच त्यांनी घास, कडवळ, सुबाभुळ, हातगं, दशरथ व राय घासाचे बियाणे तयार करून विक्री सुरु केली आहे. बियाण्यास देशभरातून ऑनलाईन मागणी वाढल्याने त्यांनी गावातील इतरांची शेती कराराने घेवून चारा लागवड केली आहे. एका वर्षात लवांडे यांनी एक एकर शेतीतून पंधरा लाखाचा नफा कमावला आहे. स्वतः जगण्यासाठी धडपड करत असलेल्या या ध्येयवेड्या युवा शेतक-याकडे आता पंधरा मजूर कामाला आहेत. प्लाॅटची माहिती देणे व देशभरातून येणारे फोन घेण्यासाठी चार जण आहेत. येथे भेट देणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशातील सर्व राज्यासह नेपाळ, बांगलादेश व सौदी अरेबियातील शेतक-यांना त्यांनी बियाणे विकले आहे.

 

वर्षात तीनशे टन चारा

चारा पीकाचा प्रयोग सुरु केल्यानंतर सुरुवातीला अनेकांनी नाव ठेवले. मात्र, सारं सहन करत जिद्द सोडली नाही. एकरी बारा हजार डोळे (बेणे) आवश्यक आहे. सरी पद्धतीने ३ फूट बाय १ फूट अंतरावर लागवड करावी. वर्षात ३ ते ४ कापण्या होतात. हा चारा १५ ते १८ फूट उंच वाढतो. वर्षभरात तीनशे टन चारा त्यातून मिळतो.

- सोमेश्वर लवांडे, संशोधक शेतकरी, फत्तेपूर, ता. नेवासा

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters