1. इतर बातम्या

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत आहे संधी

पीएम किसान सम्मान निधीच्या द्वारे केंद्र सरकार एका वर्षात सहा हजार रुपये तीन हप्त्यांत विभागून देत असते. योजना सुरू झाल्यापासून तर आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत.

KJ Staff
KJ Staff


पीएम किसान सम्मान निधीच्या द्वारे केंद्र सरकार एका वर्षात सहा हजार रुपये तीन हप्त्यांत विभागून देत असते. योजना सुरू झाल्यापासून तर आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत. जे लाभार्थी अजूनपर्यंत पीएम किसान सम्मान निधि योजनेत आपले रजिस्ट्रेशन करू नाही शकले, असे शेतकरी ३१ ऑक्टोबरच्या अगोदर अर्ज करू शकतात. जर तुमचा अर्ज स्वीकारण्यात आला तर नोव्हेंबरमध्ये तुम्हाला २ हजार रुपये मिळू शकतात. तसेच डिसेंबरमध्ये ही  २ हजार रुपये मिळतील. या योजनेच्याद्वारे केंद्र सरकार वर्षात ३ वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये ट्रान्सफर करते.

जर कोणी नवीन शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सरकार एका वेळेस दोन हप्त्याची रक्कम पास करू शकते. जर तुम्ही ३१ ऑक्टोबरच्या  आधी पीएम किसान योजनेमध्ये अर्ज केला तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबर महिन्यामध्ये नवीन हप्ता तुमच्या खात्यात जमा केला जाईल.

   पीएम किसान योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे

पीएम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच बँक अकाऊंट नंबर असणे आवश्यक आहे. कारण सरकार डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे ट्रान्सफर करत असते. तसेच आपला बँक अकाउंट नंबर आधार नंबरसोबत लिंक असावा. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स pmkisaan.gov. in या संकेतस्थळावर अपलोड करू शकतात. त्यानंतर तुम्ही फार्मर कॉर्नर या पर्यायावर नोंदणी करु शकतात. यासह तुम्हाला  जर आधार कार्ड जोडायचा आहे तर एडिट आधार डिटेल या ऑप्शनवर क्लिक करून अपडेट करू शकता.

     घरी बसून कसे रजिस्ट्रेशन करायचे?

पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट https://pmkisaan.gov.in/ या संकेतस्थळावर जावे. तेथे न्यू रजिस्ट्रेशन चा एक पर्याय असतो. त्याच्यावर क्लिक करावे त्यानंतर एक नवीन पेज ओपन होते. या नवीन पेजवर स्वतःचा आधार नंबर लिहायचा त्याच्यानंतर एक फॉर्म ओपन होतो. यात फॉर्ममध्ये पूर्ण डिटेल्स द्यावे  लागते. जसं की तुम्ही कोणत्या राज्याचे रहिवाशी आहात, तुमचा जिल्हा कोणता तुमचा तालुका आणि तुमचे गाव अशा पद्धतीची माहिती द्यावी लागते. त्याच्याशिवाय शेतकऱ्यांना स्वतःचे नाव, जेंडर, कॅटेगिरी, आधार कार्डची माहिती, बँक अकाउंट नंबर. ज्या खात्यावर तुम्हाला पैसे जमा करायचे आहेत तो अकाउंट नंबर, संबंधित बँकेचा आयएफएससी कोड, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख इतकी माहिती द्यावी लागते.

त्याशिवाय तुम्हाला तुमच्या जमिनीची माहिती द्यावी लागते. यामध्ये सर्वे नंबर या खाता नंबर, ही जमीन किती आहे हे सगळे माहिती भरावी लागते. हे सगळी माहिती भरल्यानंतर हा फार्म सेव्ह करावा लागतो. ही सगळी माहिती दिल्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी फॉर्म सबमिट होतो. हे सगळे माहिती भविष्यमध्ये स्वतःच्या माहितीसाठी आपण सुरक्षितरित्या ठेवू शकतो. आपण केलेल्या अर्जाची स्टेटस माहिती करून घेण्यासाठी हेल्पलाइन नंबर 011-24300606 या नंबर वर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून सरळ संपर्क करू शकतात.

English Summary: There is an opportunity till October 31 for the benefit of PM Kisan Yojana Published on: 27 October 2020, 11:55 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters