शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच शेतीमध्ये विकासासाठी गती द्यायला केंद्र सरकार नव-नवीन योजना अंमलात आणत आहे. या योजनांमधून केंद्र सरकारकडून पीएम किसान योजना आणली गेली आहे.यामध्ये शेतकऱ्यांच्या गटाला शेती विकासासाठी १५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये शेतकरी कृषी उपकरणे, रासायनिक खते तसेच बी-बियाणे इत्यादी सहजतेने खरेदी करू शकतात. तरी ही योजना नेमकी काय आहे आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
हेही वाचा : जाणून घ्या ! काय आहे ग्रामीण गोदाम योजना; कशी मिळवाल २५ टक्के सब्सिडी
कंपनी ॲक्टमध्ये रजिस्ट्रेशन करणे गरजेचे
पीएम किसान एफपीओ योजनेचा लाभ शेतकरी उत्पादक गटाचे कंपनी ऍक्टनुसार रजिस्टर करणे गरजेचे आहे. तेव्हा सरकार कडून आर्थिक मदत मिळू शकते. यासाठी कमीत कमी अकरा शेतकऱ्यांनी मिळून आपली स्वतःची एक ॲग्रीकल्चर कंपनी स्थापन करायला हवी. त्यानंतर उत्पादक गटाला कंपनीसोबत अजून काही शेतकऱ्यांना जोडणे आवश्यक असते. जर अकरा शेतकरी मैदानी भागात काम करत असतील तर त्यांना कमीत कमी तीनशे शेतकऱ्यांना स्वतः सोबत जोडणे आवश्यक असते. आणि सर पहाडी क्षेत्रांमध्ये उत्पादक कंपनी काम करत असेल तर कमीत कमी 100 शेतकऱ्यांना जोडणे आवश्यक आहे.
या योजनेची महत्वाची वैशिष्ट्ये
शेतकरी उत्पादक कंपनी जोडल्या गेलेले शेतकऱ्यांना रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशके आणि खुशी उपकरणे खरेदी करणे मध्ये सवलत मिळते. एफपीओ योजनेवर २०२४ पर्यंत ६ हजार ८६५ कोटी रुपये खर्च सरकार करणार आहे. शेतकरी गटांना केंद्र सरकारकडून दिले जाणारे आर्थिक मदत ३ वर्षाच्या आत पूर्ण दिली जाते. शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात सरळ लाभ मिळत असल्याने मध्यस्थी करणाऱ्यांची गरज राहत नाही. या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकतात. अजून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झालेली नाही. पण सरकार लवकरच ही सेवा सुरू करणार आहे.
हेही वाचा : काय सांगता ! फक्त साडेतीन लाखात होणार आपलं घरकूल; त्वरीत करा ! 'या' योजनेसाठी अर्ज
पीएम किसान एफपीओ योजनेचे फायदे
या योजनेनुसार देशातील शेतकऱ्यांना विविध प्रकारचे फायदे होतात जसे शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनासाठी हक्काची बाजारपेठ मिळते. तसेच शेतकऱ्यांना या योजनेद्वारे खते, बी बियाणे, कीटकनाशके आणि कृषी उपकरण खरेदी करणे सोपे होते. या योजनेचा लाभ देशातील कोणत्याही विभागातील शेतकरी सुलभतेने घेऊ शकतो.
या योजनेचे फायदे
या योजनेनुसार देशातील शेतकऱ्यांना विविध प्रकारचे फायदे होतात जसे शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनासाठी हक्काची बाजारपेठ मिळते. तसेच शेतकऱ्यांना या योजनेद्वारे खते, बी बियाणे, कीटकनाशके आणि कृषी उपकरण खरेदी करणे सोपे होते. या योजनेचा लाभ देशातील कोणत्याही विभागातील शेतकरी सुलभतेने घेऊ शकतो.
Share your comments