गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. असे असताना आता अनेकजण इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यास पसंती देत आहेत. आता कार घेणारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता Tata Motors अखेर 11 मे रोजी Nexon EV चे लाँग रेंज मॉडेल लॉन्च करणार आहे. Nexon EV ही भारतात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे.
यामुळे आता याची चर्चा सुरु आहे. अद्ययावत इलेक्ट्रिक SUV (Electric SUV) मध्ये एक मोठा बॅटरी पॅक दिसेल. अद्ययावत Nexon EV 400 किमीच्या रेंजसह आणि काही अद्ययावत वैशिष्ट्यांसह येण्याची अपेक्षा आहे. यामुळे अनेकजन ही कार घेण्यासाठी इच्छुक आहेत. अपडेट केलेल्या Nexon EV मध्ये सर्वात मोठा बदल हा नवीन 40kWh बॅटरी पॅक असेल, जो सध्याच्या मॉडेलच्या 30.2kWh युनिटपेक्षा 30 टक्के मोठा आहे.
असे असले तरी सध्याचे Nexon EV एका चार्जवर 312km जाऊ शकते, यामुळे अनेकदा लांब जाण्यासाठी अडचणी येत आहेत, यामुळे लांब-श्रेणीचे मॉडेल अधिकृत चाचणी सायकलवर 400km पेक्षा जास्त जाणे अपेक्षित आहे. ग्राहकांच्या अभिप्रायानुसार, सध्याची Nexon EV 200-220 किमीची श्रेणी देते. त्यामुळे, अद्ययावत SUV सुमारे 300-320km ची रेंज मिळण्याची अपेक्षा करणे अधिक योग्य आहे.
सध्याची Nexon EV आधीपासून रिजन ब्रेकिंगसह येते, ती हलकी आणि अॅडजस्टेबल आहे. अद्ययावत ICE Nexon वर पाहिल्याप्रमाणे लांब पल्ल्याच्या Nexon EV मध्ये सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक वैशिष्ट्ये मिळण्याची अपेक्षा आहे.यामुळे हा एक चांगला पर्याय आपल्यासमोर आहे.
महत्वाच्या बातम्या;
तरुणांनो संधीच सोनं करा! ICMR मध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा कर्ज..
दुध पावडरचे दर दुपटीने वाढले, दूध टंचाईचा मोठा फटका, शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता...
'किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी', केंद्र सरकारचा उपक्रम शेतकऱ्यांच्या दारी, शेतकऱ्यांना फायदा..
Share your comments