1. इतर

बापरे! 27 लाख शेतकऱ्यांचे अडकले पैसे; पीएम किसान योजनेत करू नका 'या' चुका

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना

तुम्ही देखील पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Scheme) नवव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही देखील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये (PM Kisan) नोंदणी केली आहे तर लवकरच तुमच्या खात्यात पैसे येतील. नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑगस्टमध्ये पाठवला जाईल.

मात्र शेतकऱ्यांच्या काही चुकांमुळे त्यांचे पैसे अडकून जातात. केंद्र सरकार पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 2000 रुपये पाठवते. एकूण 3 हप्ते अर्थात 6000 रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मिळतो. काही दिवसांपुर्वी पीएम किसान योजनेचा हप्ता सरकारने शेतकऱयांच्या खात्या हस्तांतरित केला. या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना पैसा मिळाला असे नाही, कारण PM किसानच्या पोर्टलनुसार, 27 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पाठवण्यात येणाऱ्या रकमेचं ट्रान्झॅक्शन फेल झाले आहे. शेतकऱ्यांच्या छोट्या चुकांमुळे त्यांना पैसे मिळाले नाही आहेत. तुम्ही आयएफएससी कोड, बँक खाते क्रमांक किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये कोणती चूक केली असेल तर सर्वात आधी ही चूक सुधारा. जेणेकरुन पुढचा हप्ता मिळताना कोणतीही समस्या येणार नाही.

 

या कारणामुळे अडकतील पैसे

शेतकऱ्याचे नाव इंग्रजीमध्ये असणं आवश्यक आहे
अर्जामध्ये पात्र शेतकऱ्याचं नाव आणि बँक खात्याच्या तपशीलात शेतकऱ्याच्या नावाची स्पेलिंग वेगवेगळी असल्यास
आधार कार्डावरील नाव अर्जावर असणं आवश्यक
आयएफएससी कोड चुकीचा असल्यास अडकतील पैसे
बँक खाते क्रमांक योग्य नसल्यास पैसे अडकतील

मोदी सरकारकडून सहा हजार रुपये घेण्यासाठी अशी करा नोंदणी :


पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी अद्याप नोंदणी न केलेले शेतकरी अद्याप अर्ज करू शकतात. अशा परिस्थितीत पुढील महिन्यात त्यांना हप्ता मिळेल. यासाठी प्रथम आपल्याला pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल. Farmer Corner या पर्यायावर क्लिक केल्यावर New Farmer Registration पर्याय येईल. आपण येथे विचारलेल्या सर्व माहिती भरून स्वत: ची नोंदणी करू शकता. नोंदणी झाल्यानंतर पुढील हप्ता केंद्र सरकार थेट तुमच्या बँक खात्यात पाठवेल.

 

 यादीत नाव असे चेक करा:

यासाठी तुम्हाला आधी वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल. मग Farmer Corner पर्यायावर क्लिक करा. Farmer Corner वर जाऊन लाभार्थ्यांच्या यादीवर क्लिक केल्यावर एक नवीन पृष्ठ उघडेल. तेथे तहसील आणि ब्लॉक निवडल्यानंतर आपण आपले नाव सूचीमध्ये शोधू शकता.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters