1. इतर बातम्या

Solar Farming: जर शेतकऱ्यांनी ठरवले तर, सोलर फार्मिंग ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी खूपच ठरेल फायदेशीर

सौर ऊर्जा हा ऊर्जेचा निरंतर आणि कायमस्वरूपी स्त्रोत आहे. एका बाजूला औद्योगिकविकास आणि झालेले शहरीकरणत्यामुळे ऊर्जेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
solar farming is the so benificial and can give more profit to farmer

solar farming is the so benificial and can give more profit to farmer

 सौर ऊर्जा हा ऊर्जेचा निरंतर आणि कायमस्वरूपी स्त्रोत आहे. एका बाजूला औद्योगिकविकास आणि झालेले शहरीकरणत्यामुळे ऊर्जेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

त्यामुळे अपारंपरिक ऊर्जेची गरज भासणेही वस्तुस्थिती आहे.या अपारंपारिक ऊर्जा मध्ये सर्वात योग्य, स्वस्त आणि स्वच्छ पर्याय म्हणजे सौर ऊर्जाहोय.आपल्या भारताच्या भौगोलिक स्थितीचा विचार केला तर दिसून येते की,भारताच्या बहुतेक जमिनीवरअशा प्रकारचे सूर्यकिरणे मिळतात तर अशा ठिकाणी ऊर्जा उत्पादनाला खूप संधी आहे.या सर्व गोष्टींमुळे भारत सरकारकडून सौरऊर्जेला प्राधान्य देण्याचे ठरवले गेले आहे.

भारत सरकारचे 2022 पर्यंत चे अपारंपारिक ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट हे 175 गीगावॉट इतके आहे म्हणजेयेणाऱ्या काळामध्ये 53 टक्के ऊर्जा निर्मिती ही अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतातून निर्माण करण्यात येणार आहे. यामध्ये जवळ जवळ शंभर गिगावॉट निर्मिती ही सौर ऊर्जा पासून करण्यात येणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सोलर फार्मिंग ही संकल्पना सोलर फार्मिंग शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरू शकते. या लेखामध्ये आपण सोलर फार्मिंग विषयी माहिती घेऊ.

 सोलर फार्मिंग एक उपयुक्त संकल्पना(Solar Farming Is Important Concept)

शेतीमध्ये आपल्याला बर्‍याच संकल्पना सध्या पाहायला मिळतात.हायड्रोपोनिक्स,एरोपोनिक, एक्वापोनिक्स परंतु सोलर फार्मिंग  ही संकल्पना तशी ऐकायला तशी नवीन वाटते. यासाठी तुम्ही तुमच्या नापीक किंवा पडित जमिनीवर म्हणजे ज्या जमिनीचा शेतीसाठी वापर केला जात नाही अशाशेतीवर सौर ऊर्जा निर्मिती करू शकतात.ग्रामीण भागामध्ये या व्यवसायाला खूप संधी असून भविष्यात देखील यांना खूपसंधी राहणार आहे.

ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे किंवा जमिनीवर पीक येत नाही अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन किंवा शेतकरी गटांनी एकत्र येऊन छोटा क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प सहकारी तत्त्वाने उभे करायला हवेत. ज्याप्रमाणे सहकारी तत्त्वावर कारखाने किंवा दूध डेअरी चालतात त्याप्रमाणे ऊर्जा निर्मिती प्रकल्प चालू शकतो.सोलर फार्मिंग या संकल्पनेत पाच एकर जमिनीवर जवळ जवळ एक मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प उभारणी करणे शक्‍य आहे. या प्रकल्पातून तयार केलेली वीज सरकारला विकता येते किंवा ती खासगी कंपनीला प्रतियुनिट दराने विकता येते.

अशा प्रकल्पांसाठी सरकारकडून देखील 30 टक्के  किंवा त्यापेक्षा अधिक अनुदान मिळते व अपारंपारिक ऊर्जा निर्मितीमध्ये बँक देखील कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देतात. त्यामुळे या व्यवसायाला सगळीकडून अनुकूल परिस्थिती असल्यामुळे हा उद्योग उभा करणे शक्य आहे. आज काल आपल्याला माहित आहे की सौरऊर्जेपासून बरीच सामग्री तयार केली जाते. जसे की सोलर पॅनल, सोलर इन्वर्टरइत्यादी.परंतु की सामग्री बाहेरून आयात करावी लागते.

त्यामुळे अशा सामग्रीचे उत्पादन जर भारतातच घेतले तर पैशांची बचत होते व रोजगार निर्मितीला देखील चालना मिळेल. हा व्यवसाय खूप पैसा मिळवून देणारा आहे परंतु याचा मुख्य हेतू हा स्वच्छ व शाश्वत ऊर्जा निर्मितीसाठी चालना देणे हा आहे. उदाहरणार्थ यामध्ये सोलर इन्वर्टर बनवण्याच्या कंपनीसाठी 14 लाखांची संपूर्ण गुंतवणूक आहे. 

जर भविष्यात याची मागणी वाढली तर 50 हजार ते एक लाख रुपये नफा प्रति महिना मिळू शकतो.त्यामुळे एक छोटीशी सुरवात करणे गरजेचे आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:स्टार्टअप सुरू करताना या १० चुका करू नका, हर्ष गोयनका यांचा गुरुमंत्र

नक्की वाचा:टाकळीभान उपबाजारातील प्रकार! कांद्याला मिळाला प्रतिकिलो 1 रुपये भाव; शेतकऱ्याचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

नक्की वाचा:धुंनो सावधान! जर तुम्ही कुणाला तुमच्या आधार आणि पॅन कार्डची प्रत देत असाल तर निघू शकते तुमच्या नावाने परस्पर लोन

English Summary: solar farming is the so benificial and can give more profit to farmer Published on: 17 May 2022, 01:54 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters