1. इतर बातम्या

शेतातील गोफणीचा युरोप दौरा! गोफन निशाणा वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा संघ पहिल्यांदा सहभागी

आपण सगळ्यांना गोफन माहिती आहे.गोफणीचा चा उपयोग हा शेतातील ज्वारी, बाजरी सारखा पिकांना त्रास देणाऱ्या पक्ष्यांना हाकलण्यासाठी गोफणीचा वापर केला जातो. परंतु शेतात वापरल्या जाणाऱ्या ही गोफन सध्या युरोपच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऐकून विशेष वाटले ना! या लेखात नेमका काय प्रकार आहे त्याबद्दल माहिती घेऊ.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
sling(gofan)

sling(gofan)

आपण सगळ्यांना गोफन माहिती आहे.गोफणीचा  चा उपयोग हा शेतातील ज्वारी, बाजरी सारखा पिकांना त्रास देणाऱ्या पक्ष्यांना हाकलण्यासाठी गोफणीचा वापर केला जातो. परंतु शेतात वापरल्या जाणाऱ्या ही गोफन सध्या युरोपच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऐकून  विशेष वाटले ना! या लेखात नेमका काय प्रकार आहे त्याबद्दल माहिती घेऊ.

 गोफणीच्या साह्याने निशाणा साधण्याची वर्ल्ड कप  स्पर्धा

 युरोपमधील स्पेनमध्ये गोफणीच्या साह्याने निशाणा साधण्याची वर्ल्ड कप  स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 34 देशांच्या संघांनी भाग घेतला आहे. आपल्या भारताचा संघ पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेत आहे. पुण्यात असलेले मार्शल आर्ट चे प्रशिक्षक कुंडलिक कचालेंना मागच्या वर्षी लोक डॉन मुळे आपल्या गावी जावं लागलं होतं. तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचे वडील या गोफणीचा उपयोग रात्री येणारे जनावर आणि चोरांच्या विरुद्ध शस्त्रासारखा करत असल्याचे पाहिले.

म्हणून त्यांनी ही गोपन चालवायला सुरुवात केली आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांनादेखील गोफन चालवायचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. यांनी याबाबत सखोल माहिती इंटरनेटवरून घेतल्यानंतर त्यांना समजले की गोपाला चालवण्याचे स्पर्धा स्पेन मध्ये आयोजित करण्यात आली आहे. त्यांनी ही स्पर्धा भरवणारे आयोजकयांच्याशी  संपर्क साधला असता त्यांनी कुंडलिक कचाले यांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले.

 येत्या 12 ऑक्टोबरला ही अकरा जणांची टीम स्लीगथ्रोवर्ल्डकप साठी रवाना होणार आहे. त्यासाठी या टीमने एक बऱ्याच महिन्यांपासून पुण्यात कसून सराव केला आहे.

 

 गोफण चालवण्याच्या स्पर्धेचे स्वरूप

 या स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर दगड आणि सिंगल टेनिस बॉल अशा दोन प्रकारात आयोजित केल्या जातात. पुरुषांना 20 मीटर शॉर्ट आणि तीस मीटर लॉंग अशा दोन अंतरावरून गोफणी च्या सहाय्याने निशाणा साधायचा असतो. तर महिलांना शॉर्ट दहा मीटर आणि लॉंग  वीस मीटरचा 2 अंतरावरून निशाणा साधायचा असतो. ( स्त्रोत-abplive)

English Summary: sling go to participate in sling world cup compition in spain Published on: 08 October 2021, 11:46 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters