1. इतर बातम्या

पोस्ट ऑफिसची ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना, बचतीचा राजमार्ग

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात येणारा कामाचा प्रचंड तनाव, तणावपूर्ण जीवनशैली अशा बऱ्याच समस्या आपल्या पुढे असतात. अशा अनिश्चित परिस्थितीत पैशाच्या दृष्टीने आपला भविष्यकाळ सुरक्षित करून ठेवणे हे फार महत्त्वाचे असते. त्यासाठी आपल्याला योजनां मध्ये बचतीची सवय असणे फार महत्वाचे असते. म्हणजे भविष्यकाळात जर आपल्याला काही समस्या उद्भवली तर आपण केलेल्या बचतीचा वापर करू शकतो. या लेखात आपण उत्तम बचत करून उत्तम परतावा मिळू शकणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा या योजनेविषयी माहिती घेणार आहोत.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
post office

 ही योजना भारतीय पोस्ट ऑफिस ने सुरु केले असून या योजनेमध्ये दररोज फक्त 95 रुपये जमा करून मॅच्युरिटी नंतर 14  लाख रुपयांचा परतावा मिळवू शकता. योजना ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी फार उपयुक्त आहे. कारण ग्रामीण भागातील लोकांपासून बऱ्याच ठिकाणी बँक या  दूर असल्याने त्यांना बचत करणे फार अवघड असते. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसची ही योजना ग्रामीण भागासाठी उत्तम आहे.

 या योजनेचे एक वैशिष्ट्य म्हणजे या योजनेमध्ये पॉलिसीधारकाला मॅच्युरिटी बोनस सुद्धा मिळतो. मध्ये पैसे गुंतवताना हे दोन कालावधीमध्ये कोणता येतात एक म्हणजे पहिले पंधरा वर्षे आणि दुसरे वीस वर्षे. या योजनेसाठी वयोमर्यादा हे किमान 19 वर्ष जास्तीत जास्त 45 वर्ष इतकी आहे.

 पाण्याचे महत्त्वाचे फायदे

  • या योजनेत मध्ये बॅक सुविधा उपलब्ध आहे. हा मनी बॅक बेनिफिट तीन वेळा मिळतो.
  • एखादी व्यक्ती पॉलिसीची मुदत पूर्ण होईपर्यंत जिवंत राहिली तर त्याला पैसे परत मिळण्याचा फायदा मिळतो.
  • पॉलिसी धारकास दहा लाखापर्यंत विमा रक्कम मिळते.
  • या पॉलिसीचा  महत्त्वाचा फायदा म्हणजे या पॉलिसी अंतर्गत 15 वर्षाच्या पॉलिसीमध्ये सहा वर्ष, नव वर्ष आणि बारा वर्षे पूर्ण झाल्यावर 20 टक्के रक्कम परत मिळते.
  • मॅच्युरिटी नंतर बोनस सहा उर्वरित चाळीस टक्के रक्कम देखील दिली जाते.

या योजनेअंतर्गत लागणारा हप्ता

 जर एखादी व्यक्ती पंचवीस वर्षाचे असेल तर सात लाख रुपयांचा रकमेसह वीस वर्षासाठी ही पॉलिसी घेतली तर अशा परिस्थितीत प्रत्येक महिन्याला 2853 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. या हिशोबाने आपल्याला दररोज सुमारे 95 रुपये बचत करावी लागते. या योजनेत  वार्षिक  हप्ता बत्तीस हजार सातशे पस्तीस रुपये लागतो. सहा महिन्याचा हप्ता ठेवायचा असेल तर सोळा हजार 715 रुपये लागतात आणि जर हप्ता त्रेमासिक ठेवायचा असेल तर तो आठ हजार 449 रुपये असतो.

English Summary: post office Published on: 20 June 2021, 07:10 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters