1. इतर बातम्या

पीएम किसान योजना : जाणून घ्या ! कधी येतो आपल्या खात्यात २ हजार रुपयांचा हप्ता

प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेच्या अंतर्गत छोट्या शेतकऱ्यांना वेळोवेळी दोन हजार रुपये सरकारकडून दिले जातात.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेच्या अंतर्गत छोट्या शेतकऱ्यांना वेळोवेळी दोन हजार रुपये  सरकारकडून दिले जातात. दरम्यान प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना २ हजार रुपयांचा सहावा हप्ता १ ऑगस्टला आला.  पुढील दोन ते तीन महिन्यात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसा येईल. या योजनेच्या अंतर्गत मागील हप्ता हा एप्रिल महिन्यात देण्यात आला होता.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरण करण्यास सुरुवात झाल्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान लाभार्थ्यांना पैसे मिळतील. पण आपल्याला एक प्रश्न येत असतो त्यामुळे आपली नेहमी योजनेविषयी शंका वाढू लागते ते म्हणजे आपल्या खात्यात कधी पैसा येतो. पीएम किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसा येतो याची कल्पना नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होत असते. आज आपण त्याच स्थितीविषयी जाणून घेणार आहोत. या योजनेच्या नियामांनुसार, पहिला हप्ता हा १ डिसेंबर ते ३१ मार्चदरम्यान येत असतो.

दुसरा हप्ता हा १ एप्रिल ते ३१ जुलैच्या दरम्यान येत असतो. आणि तिसरा हप्ता हा १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत असतात. म्हणजे काय एकाच दिवशी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जात नाहीत. या योजनेचे लाभार्थी कोट्यवधी शेतकरी आहेत, यामुळे पैसे हस्तांतरण करण्यास वेळ लागत असतो.

जर आपल्या अर्जाची स्थिती पाहायची असेल किंवा आपला अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही यासाठी आपण ऑनलाईन अर्जाची स्थिती चेक करु शकतात. आपल्याला सकारने दिलेल्या www.pmkisan.gov.in यावर जावे लागेल.  हे संकेतस्थळ ओपन केल्यानंतर तेथील मेन्यूमध्ये Farmers Corner हा पर्याय निवडा.  यानंतर तेथील मेन्यूमध्ये Beneficiery List वर क्लिक करा.  राज्य, जिल्हा, तालुका, आणि गावाचे नाव टाकल्यानंतर  Get Report वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर लाभार्थ्यांची यादी दिसेल. 

English Summary: PM Kisan Yojana : Find out when the instalment of Rs 2000 Published on: 04 August 2020, 03:00 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters