पीएम किसान : सहा हजारचं नाही तर शेतकऱ्यांना मिळू शकतील ३६००० रुपये, फक्त करा ' हे' काम

22 April 2021 09:44 PM By: भरत भास्कर जाधव
पीएम किसान मानधन योजना

पीएम किसान मानधन योजना

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा (Pradhanmantri kisan sanman yojana ) आठवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येणार आहे. देशातील ११ कोटी पेक्षा जास्त शेतकरी मोदी सरकारच्या या योजनेचा फायदा घेत आहे. शेतकरी आपल्या खिश्यातील एकही पैसा खर्च न करता दर महिन्याला तीन हजार रुपये मिळवू शकतील, पण फारच कमी शेतकऱ्यांना माहिती आहे.

विशेष म्हणजे शेतकऱ्यांना यासाठी कोणतेच कागदपत्र द्यावे लागत नाही. तुम्ही विचार करत असाल की, कोणत्या योजनेतून शेतकऱ्यांना इतका पैसा मिळतो. आम्ही पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेविषयी बोलत आहोत. जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. त्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड आणि पीएम किसान मानधन योजनेचा लाभ देते. मानधन योजनेसाठी कोणतेच कागदपत्र लागत नाही.

हेही वाचा : खावटी कर्ज योजना काय आहे? कोण आहे पात्र, कोणाला मिळतो पैसा ; वाचा संपुर्ण माहिती

शेतकऱ्यांना मिळतील ३६००० रुपये

पीएम किसान मानधन(Pradhanmantri kisan mandhan) योजनेच्या अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱयांना दर महिन्याला पेन्शन देते. ज्यामध्ये वयाच्या ६० वर्षानंतर मासिक पेन्शन ३००० हजार रुपये म्हणजेच ३६ हजार रुपये दिले जातात. जर एखादा शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असेल तर त्याला प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी कोणतेही कागदपत्र देण्याची गरज भासत नाही.

 

पीएम किसान योजनेतून मिळणारा पैसा थेट त्यात वळता करता येण्याचा पर्याय आहे. यामुळे शेतकऱ्याला आपल्या खिश्यातून पैसे देण्याची गरज राहणार नाही.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना पंतप्रधान शेतकरी मानधन योजना पीएम-किसान
English Summary: PM Kisan: Not 6,000, farmers can get Rs 36,000

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.