पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज : एप्रिल महिन्यातच येणार महिलांच्या बँक खात्यात पैसे

03 April 2020 04:09 PM

देशात चालू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान केंद्र सरकारने अनेक दिलासादायक निर्णय घेतले आहेत.   या निर्णयामुळे आर्थिक नुकसानाचा भार कमी झाला आहे.   सरकार या लॉकडाऊनच्या काळातच आता प्रधानमंत्री जन धन खात्यात ५०० रुपये टाकणार आहे.  हे पैसे याच महिन्यात आपल्या बँक खात्यात टाकले जातील अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी  केली आहे.  प्रत्येक प्रधानमंत्री जन धन योजानेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या बँक खात्यात ही सानुग्रह अनुदान देयक रक्कम ५०० रुपये टाकले जाणार आहेत.   पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून ही रक्कम पुढील तीन महिन्यासाठी दिली जाणार आहे. 

लाभार्थ्यांना पैसे देताना सोशल डिस्टंसचे भान राखावे, अशा सुचना अर्थ मंत्रालयाकडून बँकांना देण्यात आल्या आहेत.  मंत्रालयाने देयकाची वाटप कशाप्रकारे केली जाईल त्याविषयी एक वेळापत्रक दिले आहे.   हे वेळापत्रक आपल्या बँक खात्याच्या क्रमांकावर आधारित आहे.  खात्याच्या शेवटच्या अंकानुसार वाटपाची विभागाणी केली गेली आहे.

PMJDY च्या अंतर्ग खाते क्रमांकाच्या शेवटचा अंक कोणत्या तारखेला पैसे काढता येतील
० किंवा १    ३.४.२०२० 
२ किंवा ३  ४.४.२०२० 
४ किंवा ५  ७.४.२०२०
6 or 7 ६ किंवा ७  ८.४.२०२०
८ किंवा ९ ९.४.२०२०  

९ एप्रिलनंतर लाभार्थी आपल्या इतर सामान्य बँकेत जाऊ शकतील. ९ तारखेनंतर आपल्याला जन-धन खात्यातील ही रक्कम काढता येणार पण ही रक्कम बँका लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करेल. दरम्यान जन धनचे पैसे खात्यात आल्यानंतर बँकांकडून लाभार्थ्यांना एक संदेश पाठविण्यात येणार आहे. सदर संदेश खालील प्रमाणे असेल. 

''आम्ही तुमची काळजी घेत आहोत!. 'प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत एप्रिल महिना २०२० साठीचे पैसे ५०० रुपये दर महा महिला लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करत आहोत. आपली गैरसोय होऊ नये यासाठी उद्या दिनांक..... ला ही रक्कम काढण्यासाठी कृपया आपल्या बँकेला भेट द्यावी'. सुरक्षित रहा निरोगी रहा !

pm Garib kalyan package PMJDY bank account jan dhan yojana modi government lockdown corona virus cash प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना बँक खाते लॉकडाऊन कोरोना व्हायरस मोदी सरकार अर्थमंत्री निर्मला सीतारामण finance minister nirmala sitaraman
English Summary: PM Garib Kalyan Package: Direct Cash Transfer to Women PMJDY Account Holders for Month of April

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.