1. इतर

तुम्हाला माहिती आहे का! पॅन कार्ड वरील अक्षरांचा अर्थ

KJ Maharashtra
KJ Maharashtra
pan card

pan card

 सध्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोघंही कागदपत्र कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजनांसाठी असो ती व्यक्तिगत लाभाच्या योजना असो त्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही दोन महत्त्वाची कागदपत्रे लागतातच लागतात. यापैकी आपल्याला माहीतच आहे की पॅन कार्ड हे भारताचे इन्कम टॅक्स डिपारमेंट कडून व्यक्तीला जारी केले जाते. पॅन कार्ड वर असलेल्या नंबर यांच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीची सगळी माहिती काढली जाऊ शकते. या लेखात आपण पॅन कार्ड वरील दहा क्रमांकाचा नेमका अर्थ काय?  हे जाणून घेऊ.

 आपल्याला माहित आहे की पॅन कार्ड वर फक्त पॅन कार्ड धारकाचे नाव आणि जन्मतारीख लिहिलेली असते. परंतु आडनाव आहे पॅन कार्ड वर असलेल्या दहा नंबर पैकी एक नंबरच्या मध्ये  लपलेली असते. हा नंबर पाचवा क्रमांकाचा असतं. आयकर विभाग आपल्या डेटामध्ये फक्त पॅन कार्ड धारकांच्या आडनाव ठेवतो. म्हणूनच पॅन नंबर मध्ये देखील त्याची माहिती असते. आयकर विभाग संबंधित माहिती कार्डधारकांना देत नाही.

 आपल्याला माहित आहे की पॅन कार्ड क्रमांक हा एक  दहा अंकी क्रमांक असतो. पॅन कार्ड एक लॅमिनेटेड कार्ड च्या रूपात असते. पॅनकार्डसाठी अर्ज केलेल्या लोकांना आयकर विभागामार्फत देण्यात येते. जेव्हा व्यक्तीचे पॅन कार्ड तयार केले जाते तेव्हा ते पॅन कार्ड आयकर डिपार्टमेंटच्या पॅन कार्ड शी जोडले जातात. त्यामुळे संबंधित व्यक्तीची टॅक्स भरण्याची प्रक्रिया किंवा क्रेडिट कार्डद्वारे केलेली आर्थिक व्यवहार या सर्वांवर आयकर विभागाची नजर असते. पॅन कार्ड मधील दहा अंकी कोड चे पहिले तीन अंक  इंग्रजी अक्षरे आहेत. हे A किंवा Z पर्यंत कोणते अक्षर असू शकते. ही संख्या डिपारमेंट स्वतःहून ठरवते. पॅन कार्ड क्रमांकाचा चौथा अंक ही इंग्रजीतील एक अक्षर असते. जे  संबंधित पॅनकार्ड धारकाचे स्टेटस सांगते.

 आडनावाच्या पहिल्या अक्षरा पासून बनवला जातो पाचवा अंक

पॅन कार्ड क्रमांक आतील पाचवा अक्षर हे  इंग्रजी असते. हे पाचवे अक्षर पॅन कार्ड धारकाचे आडनावाचे पहिले अक्षर असते. पॅनकार्ड मध्ये फक्त आडनावात पाहिले जाऊ शकते. यानंतर पॅन कार्ड मध्ये चार नंबर असतात या संख्या  0001 ते 9999पर्यंत काहीही असू शकतात. ही संख्या आयकर विभागात सुरू असलेल्या नंबर सिरीजचे प्रतिनिधित्व करते. त्याचा शेवटचा अंक अल्फाबेट चेक अंक आहे, जो कोणत्याही अक्षराचा असू शकतो

 

पॅन कार्ड वरील चौथ्या लेटर ची स्टेटस काय असते ते पाहू?

P- सिंगल व्यक्ती

  • AOP(असोसिएशन ऑफ पर्सन )

C-कंपनी

F- फर्म

T- ट्रस्ट

H- हिंदू एकत्रित  कुटुंब

  • BOI( बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल )

L- लोकल

J- आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन

G- गव्हर्मेंट व्यक्ती

 माहिती  स्तोत्र -Z 24 taas

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters