Mumbai : महागाई वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोल,डिझेल दरवाढीसोबत स्वयंपाक घरातील अनेक गोष्टींचे भाव वाढले गेले आहेत. घरगुती सिलेंडरचे दर आता हजारच्या पार गेले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये जवळजवळ साडेतीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबई तसेच दिल्लीत गॅस सिलेंडरची किंमत ही हजार रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.
घरगुती गॅससोबत व्यावसायिक गॅस सिलेंडरची देखील किंमत वाढवण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर हे तब्बल आठ रुपयांनी वाढली आहे. संपूर्ण देशात महागाईचा चांगलाच भडका उडालेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक बजेट अजूनच कोलमडण्याची शक्यता आहे. गुरुवारी घरगुती आणि व्यवसायिक गॅस सिलेंडरचे नवे दर जारी करण्यात आले होते.
त्या दरानुसार मुंबईसह दिल्लीत 14.2 किलो गॅस सिलेंडरचे दर हे 1 हजार 3 रुपये इतके करण्यात आले. तसेच कोलकातामध्ये या गॅसचा दर 1,029 रुपये इतका आहे. तर चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ही 1018 रुपये 50 पैसे इतकी झाली आहे. नुकतीच 7 मे ला गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती.
महाराष्ट्र स्टार्टअप वीक २०२२, आत्ताच अर्ज करा आणि १५ लाख रुपयांची सरकारी ऑर्डर मिळवा
गॅस सिलिंडरच्या दरात भाववाढ सुरूच असताना पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल साडेतीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शिवाय व्यवसायिक सिलेंडरच्या दरात देखील आठ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सात मे ला घरगुती गॅस सिलेंडरचे दर पन्नास रुपयांनी वाढवण्यात आले होते.
आणि आता तर घरगुती गॅस सोबत व्यवसायिक गॅसदेखील वाढवण्यात आले आहेत.
सध्या इंधनात सीएनजी, पीएनजी, एलपीजी गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे मागील दीड महिन्यात सीएनजीच्या दरात चारदा वाढ करण्यात आली होती. तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरचे दर हे पंधरा दिवसांमध्ये दोनदा वाढवण्यात आले. आता गॅस सिलेंडर घेण्यासाठी जवळजवळ एक हजार रुपयांपेक्षाही अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. याचा गंभीर परिणाम सर्वसामांन्यांच्या बजेटवर होण्याची शक्यता आहे.
व्यवसायिक गॅस सिलेंडरचे दरदेखील वाढत आहेत. नुकतीच 1 मे रोजी व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती.आता पुन्हा एकदा व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल आठ रुपयांची वाढ करण्यात आली. व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात होणारी वाढ झाल्याने आता हॉटेलचे जेवण आणखी महाग होण्याची शक्यता आहे. गेल्या 9 वर्षात महागाईने चांगलाच उच्चांकी दर गाठला आहे. तर दुसरीकडे गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा झटका मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
पुण्यात रंगणार देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत, दीड कोटींचे बक्षीस...
Share your comments