1. इतर बातम्या

फक्त 10 हजार मध्ये हे बिझनेस सुरू करा, दरमहा लाखांची कमाई होईल

हे असे व्यवसाय आहेत ज्यांचे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मार्केटिंग दोन्ही प्रकारे करून आपण बक्कळ पैसे कमवू शकता आणि चांगला नफा मिळवू शकता . तुम्ही हे साईड बिझनेस म्हणून नोकरीसह करू शकता आणि कोणीही हे व्यवसाय सुरु करू शकता .

किरण भेकणे
किरण भेकणे
money

money

हे असे व्यवसाय आहेत ज्यांचे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मार्केटिंग दोन्ही प्रकारे करून आपण बक्कळ पैसे कमवू शकता आणि चांगला नफा मिळवू शकता . तुम्ही हे साईड बिझनेस म्हणून नोकरीसह करू शकता आणि कोणीही हे व्यवसाय सुरु करू शकता .

खडू बनवण्याचा व्यवसाय:

खडू बनवण्याचा असा व्यवसाय, ज्यासाठी खूप कमी गुंतवणूक आवश्यक आहे. तुम्ही घरबसल्या सहज सुरू करू शकता. सर्व शाळा-कॉलेजांमध्ये खडूची गरज असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. खडू बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. तुम्ही ते फक्त 10,000 रुपयांमध्ये सुरू करू शकता. यामध्ये पांढऱ्या खडूने रंगीत खडूही बनवता येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की खडू मुख्यतः प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवले जातात. ही पांढऱ्या रंगाची पावडर आहे. ही एक प्रकारची चिकणमाती आहे जी जिप्सम नावाच्या दगडापासून तयार केली जाते.

बिंदी बनवण्याचा व्यवसाय:

सध्या बाजारात बिंदीची मागणी खूप वाढली आहे. पूर्वी केवळ विवाहित महिलाच बिंदी लावत असत, मात्र आता मुलींनी बिंदी लावण्याचा ट्रेंड सुरू केला आहे. एवढेच नाही तर परदेशातही महिलांनी बिंदी घालण्यास सुरुवात केली आहे. अशा स्थितीत त्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. फक्त 12,000 रुपये गुंतवून घरी बसून बिंदी बनवण्याचा व्यवसाय सुरू करता येतो.

लिफाफा बनवण्याचा व्यवसाय म्हणजे लिफाफा बनवणे:

एक अतिशय सोपा आणि स्वस्त व्यवसाय. हे कागद किंवा कार्ड बोर्ड इत्यादीपासून बनवलेले उत्पादन आहे. ते बहुतेक पॅकेजिंगसाठी वापरले जाते. ज्याचा वापर कागदपत्रे, ग्रीटिंग कार्ड इत्यादी गोष्टींच्या पॅकेजिंगसाठी केला जातो. हा सदाबहार व्यवसाय आहे. म्हणजेच या व्यवसायात दर महिन्याला कमाई असेल. जर तुम्ही हा व्यवसाय घरातून सुरू केला तर तुम्हाला 10,000 ते 30,000 रुपये गुंतवावे लागतील आणि जर तुम्ही मशीनने लिफाफे बनवले तर त्यासाठी तुम्हाला 2,00,000 ते 5,00,000 रुपये गुंतवावे लागतील.

मेणबत्ती बनवणे:

 व्यवसाय(busines) काळानुसार  खूप  बदलला आहे. पूर्वी दिवा गेल्यावर मेणबत्तीचा वापर होत असे, आता वाढदिवस, घरे, हॉटेल्स सजवण्यासाठी तिचा वापर वाढला आहे. अशा परिस्थितीत मेणबत्त्यांची मागणी खूप वाढली आहे. जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही 10,000 ते 20,000 रुपयांची गुंतवणूक घरी बसून करू शकता.

English Summary: Just start this business for 10 thousand, you will earn lakhs every month Published on: 22 December 2021, 09:43 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters