1. इतर बातम्या

पती - पत्नी मिळून MIS मध्ये करा गुंतवणूक; मिळवा ७ टक्के व्याज आपल्या रक्कमेवर

सध्याच्या महागाईमुळे महिना संपर्यंत पैसा टिकत नाही. अनेकांना पैसा टिकत नसल्याची ओरड करत असतात. आपल्या नोकरीसह अजणून पैसा कमवण्याचा तुमचा विचार आहे का? तुम्ही म्हणत असाल काम करावे लागेल , असा तुम्हाला प्रश्न पडला असेल पण तुम्हाला काम न करता पैसा मिळणार आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


सध्याच्या महागाईमुळे महिना संपर्यंत पैसा टिकत नाही. अनेकांना पैसा टिकत नसल्याची ओरड करत असतात. आपल्या नोकरीसह अजणून पैसा कमवण्याचा तुमचा विचार आहे का? तुम्ही म्हणत असाल काम करावे लागेल , असा तुम्हाला प्रश्न पडला असेल पण तुम्हाला काम न करता पैसा मिळणार आहे. हो , पोस्ट ऑफिस आपल्यासाठी घेऊ आले आहे अशी स्कीम यातून आपण ७ टक्के व्याज कमावू शकतो. जर आपल्याला पैशाची गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी पोस्ट ऑफिसची एमआयएस monthly investment scheme ही स्कीम खूप फायदेशीर आहे.  या स्कीमची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पती - पत्नी दोघे या योजनेचा लाभ घेऊ शकता.

अजून काय आहेत या स्कीमची वैशिष्ट्ये

एमआयएस स्कीमच्या माध्यमातून आपण सिंगल आणि ज्वाइंट अशा दोन्ही प्रकारे खाते सुरू करु शकता. जर आपण वैयक्तिकरित्या बँक खाते उघडले तर आपण कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त  ४.५ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. तर ज्वाइंट खात्यात आपण ९ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकता. याशिवाय ही स्कीम निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप फायदेशीर आहे.

किती होणार फायदा -  या स्कीम मध्ये सध्या ७.६ टक्के वार्षिक व्याज मिळते. आपल्या जमा असलेल्या एकूण रक्कमेच्या वार्षिक व्याजाच्या हिशोबाने आपल्याला पैसे मिळतात. यात आपल्याला एकूण वार्षिक आधारावर रिटर्न मिळत असतात. जर आपल्याला महिन्याला व्याजाची गरज नाही तर आपल्या महिन्याचे व्याज मूळ रक्कमेत जोडले जाते. आपण दर महिन्याच्या हप्त्याने पैसे घेऊ शकता.

English Summary: invest in mis post office scheme , get 7 percent interest on your amount Published on: 27 May 2020, 06:20 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters