1. इतर बातम्या

मत्स्यपालन करणारे शेतकरी, तसेच मासेमारी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे असायला हव्या ह्या अँप्लिकेशन

आज, भारतातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे आणि त्याची उपयुक्तता निर्विवादपणे न संपणारी आहे, परंतु स्मार्टफोन वापरणारे बरेच लोक हे त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करत नाहीत. मोबाईलमध्ये दळणवळण, शिक्षण, स्वयंपाक, सोशल मीडिया, शॉपिंग आणि अगदी कृषी आणि संलग्न क्षेत्रांसारख्या अशा अनेक उपयुक्त मोबाइल अँप्लिकेशन आहेत!

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
fishery

fishery

आज, भारतातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे आणि त्याची उपयुक्तता निर्विवादपणे न संपणारी आहे, परंतु स्मार्टफोन वापरणारे बरेच लोक हे त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करत नाहीत.  मोबाईलमध्ये दळणवळण, शिक्षण, स्वयंपाक, सोशल मीडिया, शॉपिंग आणि अगदी कृषी आणि संलग्न क्षेत्रांसारख्या अशा अनेक उपयुक्त मोबाइल अँप्लिकेशन आहेत! 

या लेखात, आज आम्ही तुम्हाला मच्छीमारांसाठी अत्यंत उपयुक्त अशा अँप्लिकेशन विषयी माहिती देणार आहोत, जी तुमच्या नक्कीच कामाची ठरेलं. आणि हो ऐका मंडळी ह्या सर्व अँप्लिकेशन गूगल प्ले स्टोर वरती मोफत उपलब्ध आहेत.

 

1.मत्स्य सेतू

मत्स्य सेतू, ICAR- सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर एक्वाकल्चर (ICAR-CIFA), भुवनेश्वर, ओडिशाचे व्हर्च्युअल लर्निंग अँप.  ह्या अँप्लिकेशनमध्ये अनेक महत्वाच्या व्यावसायिक माशांच्या प्रजातींच्या प्रजनन आणि संस्कृतीचे तपशीलवार व्हिडिओ व्याख्याने आहेत. हे अँप्लिकेशन कोर्स मॉड्यूल क्विझसह स्व-शिक्षण शैलीमध्ये डिझाइन केले गेले आहे.

हे अँप विशेषतः कार्प, कॅटफिश, स्कॅम्पी, मुरेल, ऑर्नामेंटल मासे, इत्यादी व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या माशांच्या वाढत्या संस्कृतीवर लक्ष केंद्रित करते. एवढेच नाही तर मोत्यांची शेतीबद्दल पण माहिती देते.

मत्स्य सेतूचा उपयोग विविध योजनांची नवीनतम माहिती भागधारकांमध्ये, विशेषत: मच्छीमार, मासे उत्पादक, तरुण आणि देशातील उद्योजकांमध्ये प्रसारित करण्यासाठी आणि व्यवसाय सुलभ करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

 

2.CIBA SHRIMP APP

आयसीएआर-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकीशवॉटर एक्वाकल्चर (सीआयबीए) येथील शास्त्रज्ञांच्या टीमने CIBA SHRIMP हे अँप विकसित केले आहे. CIBA SHRIMP हे एक अभिनव संप्रेषण चॅनेल आहे जे कोळंबीचे उत्पादन घेणारे शेतकरी, उद्योजक आणि विस्तार कर्मचारी यांना तांत्रिक सहाय्य प्रदान करते आणि त्यांना वैज्ञानिक समुदायाशी जोडते. CIBA SHRIMP हे अँप ऑफलाइन देखील काम करते. खाली सूचीबद्ध केल्यानुसार अँप हे अनेक मॉड्यूल्ससह अपडेट केले गेले आहे:

»उत्तम व्यवस्थापन पद्धती (बीएमपी)

»तलावाचे क्षेत्रफळ आणि परिमाण, तलावातील एकूण बायोमास, निर्जंतुकीकरण आवश्यकता, फीड रेशनिंग इत्यादीचा अंदाज लावण्यासाठी इनपुट कॅल्क्युलेटर.

»डिसिज डायग्नोस्टिक्स

»कोळंबी फार्म रिस्क असेसमेंट मॉड्यूल

»अपडेट आणि सल्ला

»सरकारी नियम

 3.mKRISHI FISHERIES APP

 mKRISHI फिशरीज हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) इनोव्हेशन लॅब- मुंबईने ICAR- सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS) हैदराबाद यांच्या सहकार्याने विकसित केलेले मोबाइल अँप आहे.

 

हे अँप उपग्रहांकडून प्राप्त रिमोट सेन्सिंग डेटा, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आणि विविध माशांचे अन्न असलेल्या फायटोप्लँक्टनच्या उपस्थितीच्या सहाय्याने संभाव्य मासेमारी झोन ​​ओळखण्यास मदत करते. मच्छीमार या सेवेचा उपयोग त्यांच्या मासेमारीच्या ट्रिपसाठी आणि समुद्रात जाण्याच्या योजनेसाठी करू शकतात.

English Summary: important mobile application for fishery Published on: 23 September 2021, 05:24 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters