1. इतर बातम्या

आयसीआयसीआय लोम्बार्डने आणल्या चार नवीन आरोग्य विमा योजना

सर्वसाधारण विमा क्षेत्रात आघाडीची खासगी कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्डने विमाधारकांना अधिकाधिक फायदे बहाल करणाऱ्या चार नवीन आरोग्य विमा योजनांची घोषणा केली.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
photo-vccircle

photo-vccircle


सर्वसाधारण विमा क्षेत्रात आघाडीची खासगी कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्डने विमाधारकांना अधिकाधिक फायदे बहाल करणाऱ्या चार नवीन आरोग्य विमा योजनांची घोषणा केली. हेल्थ शील्ल्ड, हेल्थ शील्ड प्लस, हेल्थ एलीट आणि हेल्ट एलीट प्लस या चार नवीन आरोग्य विमा योजना कंपनीने बाजारात उतरविल्या आहेत. या योजनांमध्ये अनेक नवीन वैशिष्टे असून ग्राहकांना व्यापक संरक्षण देण्यासाठी अनेक सुविधांआधारे विम्याची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे. नवीन विमा फायद्यांमध्ये अवयवदानाचा खर्च, घरीच राहून रुग्णालयीन सेवांचा लाभ, आप्तकालीन मदत, जागतिक पातळीवर विमा कवचाचा वापर, विमा रक्कमेचा लाभ अमर्याद वेळा वाढविण्याची संधी, हवाई टॅक्सीसेवा वापरण्याची संधी, सुपर नो क्लेम बोनस, संरक्षित विमा रकमेचे चलनवाढ दरानुसार रक्षण तसेच दावा संरक्षण, कॅशलेस ओपीडी सेवा आदी नवीन वैशिष्टांचा समावेश करण्यात आलेला आहे.

सध्याच्या नवीन परिस्थितीला अनुसरुन आयसीआयसीआय लोम्बार्डने देऊ केलेल्या नव्या फायद्यांमुळे आरोग्य विमा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला तर आहेच, परंतु त्याचबरोबर  ग्राहकांच्या आजच्या काळातील गरजांचीही दखल घेतली गेली आहे.कोवीड-19 च्या फैलावामुळे ग्राहकांमध्ये आरोग्य विम्याचे कवच प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागरुकता वाढली आहे.आरोग्य विमा म्हणजे खिशाला भुर्दंड ही ग्राहकांची मानसिकता दुर होऊन एक नियमित गुंतवणूक म्हणून त्याचा आता ते विचार करत आहेत. याचबरोबर विनास्पर्श सेवा, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर आणि डिजीटल सेवा काळाची गरज झाली असून अनेक गरजा वेगाने वाढत आहेत. काळाचे हे बदल लक्षात घेत आयसीआय़सीआय लोम्बार्डने त्यांच्या आरोग्य विम्यामध्ये अनेक व्यापक फायदे समाविष्ट करत ग्राहकांना जीवन नव्याने सुरुवात करण्यात एकप्रकारे मदतच केली आहे.

 

रुग्णाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करणे, दैनंदिन देखभाल आणि उपचारासारख्या दररोजच्या गरजांची दखल घेतानाच कंपनीने नवीन योजनांमध्ये विमा कवच आणखी व्यापक करताना अशा प्रकारच्या सुविधा पहिल्यांदाच ग्राहकांना दिल्या आहेत. पहिल्यांदाच आरोग्य विमा क्षेत्रात आणण्यात आलेल्या अशा सुविधांमध्ये दाव्याचे रक्षण, अमर्याद वेळा लाभवाढ (अनलिमिटेड रिसेट बेनेफिट), संरक्षित विमा रकमेला कवच (एएसआय प्रोटेक्टर), घरातच रुग्णालयातील सेवांचा लाभ, जगभर विमा पॉलिसी वापरणे  आदींचा समावेश करण्यात आलेला आहे.

English Summary: ICICI Lombard launch Four new health insurance scheme Published on: 21 December 2020, 10:20 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters