1. इतर बातम्या

जाणून घ्या, शेती साठी उपयुक्त असणारे आणि फायदेशीर असणारे काही अँप्स

आधुनिक शेती करणे खूपच गरजेचे आहे. कारण पारंपरिक पद्धतीचा अवलंब करून शेती केली तर सध्या बियाणांचा सुद्धा खर्च निघत नाही त्यामुळं आजच्या घडीला आधुनिक शेती आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे आत्यावश्यक आहे

किरण भेकणे
किरण भेकणे
farming app

farming app

आधुनिक शेती करणे खूपच गरजेचे आहे. कारण पारंपरिक पद्धतीचा अवलंब करून शेती केली तर सध्या बियाणांचा सुद्धा खर्च निघत नाही त्यामुळं आजच्या घडीला आधुनिक शेती आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे आत्यावश्यक आहे

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहे. बरेच शेतकरी सुद्धा स्मार्ट फोन चा वापर करतात. परंतु तुम्हाला माहितेय का त्याचा स्मार्ट फोन चा उपयोग करून काही शेतीविषयक महत्वाच्या अँप्स सुद्धा घेऊ शकता आणि नवनवीन सुविधा, शेतीची माहिती, यांत्रिकीकरण,तसेच बाजार भावाचे थेट अपडेट आपल्याला काही क्षणातच मिळून जाते.

तसेच बदलत्या काळात शेतकरी वर्गाने नेहमी अपडेट राहण्यासाठी या अँप वापरल्याच पाहिजेत:

1)किसान सुविधा:- हे अँप 2016 या साली लाँच।केले आहे. तसेच रोजच्या हवामानाच्या येणाऱ्या बातम्या,हवामानातील अनिश्चितता, या सर्वांची माहिती शेतकऱ्यांना या अँप वर मिळते. त्यामुळं शेतकऱ्यांनी या अँप चा वापर करून नुकसान आधीच काळजी घ्यावी.

2)एफको किसान:- साल 2015 साली रोजी हे अँप डेव्हलप करण्यात आले. या अँप्स च्या माध्यमातून शेतकरी वर्गाला शेतीच्या काही टिप्स, हवामान विषयक काही अपडेट, तसेच बाजारातील पिकांची किंमत आणि रोजचा बाजार भाव याविषयी ची सर्व माहिती मिळते.

3)RML फार्मर कृषि मित्र :- या अँपचा (app) वापर करून शेतकरी सर्व ठिकाणचे वेगवेगळ्या पिकाचे बाजार भाव बघू शकतो. तसेच हवामान विषयक महत्वाची माहिती सुद्धा या अँपच्या माध्यमातून आपण बघू शकतो. या अँप च्या माध्यमातून भारतातील शेतकरी १७  राज्यातील ५०,०००  गावातील ३५००  ठिकाणाच्या  हवामानाचा अंदाज घेऊ शकतात. तसेच  या अॅप चा उपयोग करून १३०० बाजारातील ४५० पेक्षा जास्त पिकांविषयी मिळवू शकतो.


4)क्रॉप इन्शॉरन्स:- या अँप च्या माध्यमातून शेतकरी आपल्या रानातील पिकांच्या विम्याबाबात आपल्याला माहिती मिळते. या अॅपद्वारे शेतकरी एकवेळ देयक रक्कम, प्रीमियम, सब्सिडी रक्कम मिळवू शकतात. हे अॅप केवळ हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे.

5)अॅग्री अँप:- या अँप चा उपयोग करून रानातील पिकांचे संरक्षण करणे तसेच पिकांची सर्व योग्य माहिती दिलेली असते.

6)कृषि ज्ञान:-या अॅपच्या (app)माध्यमातून शेतकरी शेतीविषयक प्रत्येक लहानसहान माहिती मिळवू शकतो. तसेच सर्व प्रकारची सामान्य माहिती या अँपद्वारे मिळतेच पण  त्याचबरोबर अॅपद्वारे किसान कृषि ज्ञान तज्ञांना शेतकरी वेगवेगळे शेतीविषयक आपले प्रश्न विचारू शकतात. त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या अॅपमधील नोटिफिकेशन च्या माध्यमातून आपल्याला मिळतात मिळतात.

त्यामुळे आधुनिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड असणे खूप आवश्यक आहे तसेच शेतकरी वर्गासाठी खूप फायदेशीर आहे.

English Summary: Here are some amps that are useful and beneficial for agriculture Published on: 14 October 2021, 06:51 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters